मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का?

Suri Tribe : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज आपण नैऋत्य इथिओपियामध्ये आढळणाऱ्या सुरी जमातील परंपरांची माहिती जाणून घेणार आहोत.

मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत... लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का?
Suri Tribe Marriage
Image Credit source: Google
| Updated on: Dec 09, 2025 | 5:50 PM

जगभरात अनेक अनोख्या जमाती आहेत आणि त्यांच्या परंपराही अनोख्या आहेत. खासकरून आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. या परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहेत. मात्र यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. नैऋत्य इथिओपियामध्ये सुरी जमात आढळते. या जमातील अंदाजे 20 हजार लोक आहेत. ओमो व्हॅलीच्या बेंच माझी प्रदेशात राहणारी ही जनात निलो-सहारा भाषांपैकी एक भाषा बोलते. या जमातीच्या दोन अतिशय विचित्र परंपरा आहेत. पहिली परंपरा म्हणजे मुलगी तारुण्यात येताच तिच्या खालच्या ओठात एक छिद्र पाडले जाते आणि या छिद्रात मातीची चकती घातली जाते. त्यामुळे हे छिद्र दिवसेंदिवस आणखी मोठे होते. दुसरी परंपरा म्हणजे या जमातीलील मुलांना लग्न करायचे असेल तर लढाई करावी लागते. यात काही तरुणांना जीवही गमवावा लागतो.

लग्नासाठी करावे लागते रक्तरंजित युद्ध

सूरी जमातीतील मुलींना लग्न कराचये असल्यास त्यांना त्यांचे शौर्य दाखवावे लागते. यासाठी त्यामुळे दुसऱ्या मुलासोबत लढाई करावी लागते. या युद्धादरम्यान मुलांना विवस्त्र व्हावे लागते. लाकडी काठ्यांनी ते एकमेकांशी भिडतात. या लढाईपूर्वी ही मुले प्राण्यांचे रक्त पितात. यामुळे लढण्यासाठी ताकद येते असा त्यांचा विश्वास आहे. ही लढाई इतकी भयंकर असते की यात एखाद्या मुलाचा मृत्यू देखील होऊ शकतो. या लढाईद्वारे मुले मुलींना आकर्षित करतात. जो मुलगा युद्ध जिंकतो त्याला वधू मिळते आणि नंतर तो तिच्याशी लग्न करतो.

मुलींच्या ओठांमध्ये मातीची चकती घातलात

सूरी जमातीच्या मुलींना तारुण्यात येतात आपल्या खालच्या ओठात चकती घालावी लागते. यासाठी मुलीचे दोन खालचे पुढचे दात काढले जातात. त्यानंतर तिच्या खालच्या ओठात एक छिद्र पाडले जाते आणि त्यात एक गोल चकती घातली जाते. ही चकती मातीची किंवा लाकडाची असते. दर सहा महिन्यांनी ही चकती बदलली जाते आणि दरवेळी तिचा आकार वाढवला जातो. यामुळे छिद्राचा आकार देखील वाढतो.

ही परंपरा का पाळली जाते?

ज्या महिलेच्या ओठांमध्ये मोठी चकती असते, तितकी तिची सामाजिक स्थिती चांगली मानली जाते, तसेच तिला जास्त हुंडा मिळतो. या जमातीने मुलींना गुलामगिरी आणि तस्करीपासून वाचवण्यासाठी ही परंपरा सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. कारण असे केल्यामुळे मुलींचे सौदर्य कमी होते. त्यामुळे त्याना गुलाम बनवण्याची शक्यताही कमी होते.