AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा जग बुडणार अंधारात, नव्या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण या दिवशी, जाणून घ्या तारीख आणि वेळ..

Surya Grahan 2026 : सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. विशेष म्हणजे यादरम्यान अनेक बदल सुर्याभोवती होतात. काही सेकंद काही वेळ सर्वत्र अंधार बघायला मिळतो. 2026 चे सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात आहे.

दिवसा जग बुडणार अंधारात, नव्या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण या दिवशी, जाणून घ्या तारीख आणि वेळ..
Surya Grahan
| Updated on: Nov 10, 2025 | 9:35 AM
Share

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणात चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, त्यावेळी सूर्यग्रहण होते. ग्रहणादरम्यान अनेक खगोलीय घटना घडत असतात. वर्षातील एक किंवा दोन वेळा ग्रहण येते. 2025 मध्येही ग्रहण होऊन गेले. नवीन वर्षात अर्थात 2026 मध्येही फेब्रुवारी महिन्यातच सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहणाचा दिवस शास्त्रांसोबतच खगोलप्रेमींसाठी महत्वाचा असतो. सूर्याच्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. 2025 दोन सूर्यग्रहण होते. मात्र, एकही भारतात बघायला मिळाले नाही. फेब्रुवारीत 2026 मधील पहिले सूर्यग्रहण असणार आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी हे सूर्यग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण नेमके कुठे कुठे दिसणार हे जाणून घेऊयात.

कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार या दिवशी 

हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल म्हणजेच ग्रहणाच्या वेळी सूर्याभोवती अग्नीचे वलय दिसेल. 17 फेब्रुवारी 2026 रोजी आंशिक सूर्यग्रहण दिसेल. हे अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक, अटलांटिक आणि दक्षिण महासागरांच्या काही भागांमधून दिसेल. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये. 2025 मधीलही एकही सूर्यग्रहण भारतात दिसले नव्हते.

हे सूर्यग्रहण कुठे दिसणार जाणून घ्या 

दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेचा काही भाग आणि दक्षिण हिंद महासागरातील लोक सूर्य अंशतः झाकलेला पाहू शकतील. हा एक वेगळा अनुभव असणार आहे. सूर्याचा फक्त 3 टक्के भाग काही ठिकाणी बघायला मिळेल. 2026 चे दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी होईल. म्हणजेच थोडक्यात काय तर 2025 प्रमाणेच 2026 दरम्यान देखील दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत.

दिवसा होणार पूर्णपणे काही मिनिटांसाठी अंधार 

सूर्यग्रहणावेळी काही मिनिटे संपूर्ण अंधार होतो. दिवसा काही मिनिटांसाठी अंधार होण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. यादरम्यान सूर्याच्या आसपास अनेक हालचाली होतात, ज्या आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात. हे सूर्यग्रहण 2 मिनिटे 1 सेकंद चालणार आहे. दोन मिनिट दिवसा पूर्णपणे अंधार असणार आहे. हे सूर्यग्रहण 2026 मधील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतात ग्रहणाला अधिक महत्व असून लोक यादरम्यान सुतक पाळतात. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला