24 भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला, भारत सरकार अ‍ॅक्शन मोडवर, टार्गेट करत..

होर्मुज खाडीत पुन्हा तणाव वाढताना दिसत आहे. जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. त्यातच आता भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. यावर भारत सरकारने मोठे भाष्य केले.

24 भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला, भारत सरकार अ‍ॅक्शन मोडवर, टार्गेट करत..
Hormuz Gulf
| Updated on: Nov 17, 2026 | 2:18 PM

होर्मुज खाडीत पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही तासात होर्मुज खाडीत तेल घेऊन जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्यात आली. या हल्ल्यामुळे तणाव वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून होर्मुज खाडी शांत होती. पण पुन्हा काही तासांपासून होर्मुज खाडीत हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडीत भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. पण भारताला इराणकडून धक्का देण्यात आला. होर्मुज खाडीत 16 नोव्हेंबर रोजी पनामाचा झेंडा असलेल्या LPG गॅस वाहून नेणारे जहाज तारा गॅसवर मिसाईल हल्ला करण्यात आला. या जहाजावर 24 भारतीयांसोबत एकून 25 क्रू मेंबर होते. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावर बोलताना म्हटले की, सरकार सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहे. जहाजच्या कंपनीसोबत आम्ही सतत संपर्कात आहोत. भारतीय नाविकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. तसे हल्ले सध्या थांबली आहेत.

Loading...

पण युद्धविराम करार दोन्ही देशात अजून झाली नाहीत. याकरिता अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणकडून अशाप्रकारचे हल्ले केले जात असल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या गगणाला पोहोचतात. त्यातच आता जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे.

भारतात आखाती देशातून येणारा एलपीजी गॅस हा मुख्यता: होर्मुज खाडीतूनच येतो. होर्मुज खाडीत तणाव वाढला की, भारताचे टेन्शन अधिक वाढते. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद टोकाला पोहोचल्यानंतर भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा होता. हेच नाही तर भारतीय कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ देखील केली होती. आता होर्मुज खाडीतील तणाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला अधिक झळ बसण्याची शक्यता आहे. भारत सरकार परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us