Russia Attack : रशिया हादरलं, चर्चवर दहशतवादी हल्ला, 17 पोलिसांसह अनेकांचा मृत्यू , 6 हल्लेखोरांचा खात्मा

Gunmen involved in the attack killed : रशिया पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. डागेस्तान प्रांतातील दोन शहरांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 पोलीस आणि एका धर्मगुरूसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांचाही खात्मा केला.

Russia Attack : रशिया हादरलं, चर्चवर दहशतवादी हल्ला, 17 पोलिसांसह अनेकांचा मृत्यू , 6 हल्लेखोरांचा खात्मा
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 8:26 AM

रशियातील डागेस्तान प्रांतातील दोन शहरांवर रविवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यामध्ये 17 पोलिस आणि चर्चेमधील फादर यांच्यासह अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या कारवाईत रशियन सैनिकांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रशियातील डागेस्तान भागात सैन्याचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रशियातील रस्त्यांवर टँक आणि स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले असून गेल्या 9 तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात अधिकारी, एक धर्मगुरू आणि एका चर्चच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. दागेस्तानमधील डर्बेंट आणि मखाचकला या दोन शहरांमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे शोक दिवस घोषित करण्यात आले आहेत.

एकाच वेळी दोन चर्चवर हल्ला

रशियामध्ये हल्लेखोरांकडून एकाच वेळी दोन अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात डर्बेंट आणि मखचकाला शहरीत चर्चचा तसेच पोलिस स्टेशनचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी चर्चमध्ये ऑटोमॅटिक शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केला. एवढंच नव्हे तर दहशतवाद्यांनी डर्बेंटमधील फादर निकोले यांची देखील हत्या केली. क्रूरकर्मा दहशतवाद्यांनी त्यांचा थेट गळा कापला. मखचकला आणि डर्बेंटमध्ये प्रार्थना सभांवर हल्ला करण्यात आला. तसेच डर्बेंटमध्ये प्रार्थना सभेत आग लावण्यात आल्याने तो भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाचीही हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ऑपरेशन लाँच करण्यात आले असून यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

हल्ल्यानंतर रशियन सैनिक ॲक्शन मोडवर

मखचकला येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर रशियन कमांडो ॲक्शन मोडवर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी चर्चवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ल्यानंतर  लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न

अज्ञात हल्लेखोरांनी सामाजिक परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.  हा हल्ला नेमका कोणी आणि का केला याचा शोध सुरू असून मृत झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 लोकांनी चर्चेमध्ये आश्रय घेतला होता. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचे आणि घाबरून जाऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य.
शाहांचा जळजळीत हल्लाबोल,आमदार-नेते दादासोबत तरी पवारांवरील टीका अमान्य
शाहांचा जळजळीत हल्लाबोल,आमदार-नेते दादासोबत तरी पवारांवरील टीका अमान्य.
शरद पवार भेटीनंतर शिंदे फडणवीसांच्या भेटीला, आरक्षणासंदर्भात काय चर्चा
शरद पवार भेटीनंतर शिंदे फडणवीसांच्या भेटीला, आरक्षणासंदर्भात काय चर्चा.
गुलाबी जॅकेटनंतर 'गुलाबी रिक्षा',काय आहे योजना? तुम्हालाही मिळणार लाभ?
गुलाबी जॅकेटनंतर 'गुलाबी रिक्षा',काय आहे योजना? तुम्हालाही मिळणार लाभ?.
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.