AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय, इराणवर थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेने मोठा हल्ला केला. ज्यामुळे स्थिती अधिक गंभीर झाली. अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला इराणने देखील मोठे उत्तर दिले. पुन्हा स्थिती गंभीर बनली आहे.

जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय, इराणवर थेट..
Iran
| Updated on: Aug 31, 2026 | 7:19 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटताना दिसत आहे. पुन्हा अमेरिकेने मोठा हल्ला केला. या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. मागच्या एक महिन्यापासून होर्मुज खाडीत शांतता होती. आता पुन्हा भीषण हल्ला करण्यात आला. अमेरिकी सैन्याने पुन्हा होर्मुज खाडीतील लारक द्वीपवर मोठा हल्ला केला. ज्यानंतर इराणचा थयथयाट बघायला मिळाला. इराणने या हल्ल्याला उत्तर दिले. अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. मागील काही महिन्यापासून इराण आणि अमेरिका यांच्यात मोठे युद्ध पेटले आहे. एक महिन्यापासून हल्ले थांबली होती. आता पुन्हा हल्ले सुरू झाले. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसतात. मागच्या 6 महिन्यांपासून दोन्ही देशात तणाव आहे. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचला. शिवाय पुरवठा साखळीही तुटली विस्कळीत झाली.

त्यातच अमेरिकेने पुन्हा हल्ला केला. होर्मुज खाडी कायमच या युद्धाच टार्गेट राहिली आहे. इराणचा महत्वपूर्ण भाग होर्मुज खाडी आहे. पण अमेरिका अनेकदा या होर्मुज खाडीवर दावा करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत होर्मुज खाडीला अमेरिकेचा भाग म्हटले होते.

अमेरिकेकडून देण्यात आलेल्या या हल्ल्याच्या माहितीनुसार, नुकताच झालेले हल्ले जहाजांच्या सुरक्षेसाठी होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी दावा केला की, इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डकडून लारक द्वीपवर असे रॉकेट तयार केले जात होते, जे समुद्री सुरंगे उडवली जातील. IRGC ने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर स्पष्ट केले की, सैन्य कर्चचारी आणि एक नागरिक या हल्ल्यात जखमी झाले.

इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा ताबडतोब उत्तर दिले. अमरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून जोर्डन येथील अमेरिकेच्या ठिकाणांनी हल्ला करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा तणाव वाढताना दिसत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध काही शांत होताना दिसत नाही. हे युद्ध थांबावे, ही संपूर्ण जगाची इच्छा आहे.

Follow Us
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु