AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धात ही दोन सैन्य बलात्काराला शस्त्र बनवतात, UN कडून ब्लॅकलिस्ट, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

युद्धकाळात फक्त लढाईच होत नाही, तर युद्ध गुन्हे सुद्धा घडतात. हिंसाचार होतात. अनेक देशांच्या सैन्यावर आतापर्यंत युद्ध गुन्ह्यांचे आरोप झाले आहेत. आता संयुक्त राष्ट्राने दोन मोठ्या देशांच्या सैन्यावर गंभीर आरोप केले आहेत.

युद्धात ही दोन सैन्य बलात्काराला शस्त्र बनवतात, UN कडून ब्लॅकलिस्ट, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
GazaImage Credit source: PTI
| Updated on: May 29, 2026 | 9:43 AM
Share

इस्रायल आणि रशियन सैन्याला संयुक्त राष्ट्राने ब्लॅकलिस्ट केलं आहे. युद्धा दरम्यान लैंगिक हिंसाचार करणाऱ्या समूहामध्ये या दोन देशाच्या सैन्याचा समावेश केला आहे. UN कडून दरवर्षी ही लिस्ट जाहीर केली जाते. युद्धा दरम्यान संघटित पद्धतीने लैंगिक हिंसाचार करण्याचा आरोप असलेल्या सरकारी आणि बिगर सरकारी समूहांना या लिस्टमध्ये टाकलं जातं. यूएनच्या या लिस्टमध्ये फक्त इस्रायल, रशियाचं नाही तर सूदान, हैती, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, म्यानमार, सीरिया आणि माली सारखे देशही आहेत. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात UN चे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि रशियाचं नाव या लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला होता. युक्रेन युद्ध आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाइनच्या भागात लैंगिक हिंसाचाराच्या घटना आणि त्यांचा एक पॅटर्न समोर आला आहे. यूएनने या गोष्टी नमूद केल्या आहेत.

सुरक्षा परिषदेच्या सदस्यांपर्यंत पोहोचण्याआधीच AFP ने हा रिपोर्ट पाहिला आहे. “2025 साली इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाइनच्या भागात अटकेत ठेवलेल्या पॅलेस्टिनी विरोधात लैंगिक हिंसाचाराची प्रकरणं समोर आली आहेत” असं इस्रायलबद्दल या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. “UN ने पुष्टि केलेल्या प्रकरणात अनेक वर्षांपासून सुर असलेला पॅटर्न दिसतो. इस्रायलच्या जेलपर्यंत जाण्याची परवानगी मिळत नसल्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही” असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

आमचं या सरचिटणीसाबरोबर काम संपलं

एंटोनियो गुटेरेस यांचा हा निर्णय अत्यंत लज्जास्पद आणि तथ्यहीन असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. हमास सोबत आम्हाला जोडण्याचा हा खोटा प्रयत्न आहे. हमास आधीपासूनच या यादीत आहे अशी प्रतिक्रिया इस्रायलने दिली.संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, “आता आमचं या सरचिटणीसाबरोबर काम संपलं आहे. गुटेरेस यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. तो पर्यंत सरचिटणीसाच्या कार्यालयासोबत आम्ही आमचे संबंध संपवत आहोत”

UN ला चौकशीपासून थांबवलं नाही

“UN ला चौकशीपासून थांबवलं नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. UN च्या प्रतिनिधींना इस्रायलला येऊन चौकशी करण्याचं आम्ही निमंत्रण दिलं होतं. पण त्यांनीच यायला नकार दिला व इस्रायल विरुद्ध अभियान कायम ठेवलं” असं इस्रायली राजदूत डॅनी डॅनन म्हणाले.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल