AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताबडतोब परत या… H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर खळबळ, कंपन्यांचे भारतीय कर्मचाऱ्यांना थेट…

H-1B Visa Rule Changes : डोनाल्ड ट्रम्प हे भारताला कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधताना दिसत आहेत. दुसरीकडे आता त्यांनी H-1B व्हिसाबद्दलही अत्यंत धक्कादायक निर्णय घेतल्याचे बघायला मिळाले. यामुळे अमेरिकेत काम करणारे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.

ताबडतोब परत या... H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर खळबळ, कंपन्यांचे भारतीय कर्मचाऱ्यांना थेट...
H-1B visa
| Updated on: Sep 20, 2025 | 2:29 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसत आहेत. सर्वात पहिला धक्का म्हणजे भारतावर 50 टक्के टॅरिफ, दुसरा धक्का म्हणजे चाबहार बंदर भारताच्या हातून काढले आणि आता तिसरा धक्का म्हणजे H-1B व्हिसाबद्दल घेतलेला धक्कादायक निर्णय. अमेरिकेने H-1B व्हिसावरील फीस थेट वाढून टाकली असून साधारणपणे 83 लाख रूपये लावण्यात आली. H-1B व्हिसावरच भारतीय नागरिक हे अमेरिकेत नोकऱ्या करतात. या नवीन नियमामुळे अनेक जण अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सरकारने लावलेला हा निर्णय 21 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना थेट अलर्ट पाठवलाय. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदार वर्ग अडचणीत सापडला. कारण H-1B व्हिसा सर्वात जास्त भारतीय नागरिकांकडेच आहे. इमिग्रेशन अटॉर्जी आणि टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा इशारा देत लगेचच अमेरिकेत परत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाही तर त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखले जाईल किंवा ते फसतील. सोशल मीडियावर सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा एक मेल तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

ज्यामध्ये त्यांनी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत लगेचच परतण्यास सांगितले. हेच नाही तर अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिलाय. सध्या H-1B व्हिसा धारक हे मोठ्या संख्येने सुट्टीवर अमेरिकेच्या बाहेर आहेत. मात्र, त्यांना तात्काळ अमेरिका गाठण्यास सांगितले असून अमेरिकेतच राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या H-1B व्हिसाच्या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची नोकरी धोक्यात आहे.

H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे भारताला धक्का देण्यासाठी अजून काय धक्कादायक निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, एकीकडे भारताच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प हे निर्णय घेताना दिसत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दलच्या संबंधांबाबत चांगली विधाने करत आहेत. यामध्येही डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका जगापुढे आली आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ