AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक भारतीयाची तळ पायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही… अमेरिकेने केले पाकिस्तानबद्दल हैराण करणारे विधान, थेट..

मागच्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध बदलले आहेत. पाकिस्तान अमेरिकेची चाटूगिरी करत आहे. भारताविरोधात षडयंत्र आखत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेने पाकिस्तानबद्दल केलेले विधान अत्यंत धक्कादायक आहे.

प्रत्येक भारतीयाची तळ पायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही... अमेरिकेने केले पाकिस्तानबद्दल हैराण करणारे विधान, थेट..
US Defense Secretary Pete Hegseth
| Updated on: Jun 01, 2026 | 9:26 AM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत.पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणली जातात. काश्मीरचा मोठा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव आणण्याकरिता पाकिस्तान अमेरिकेसोबत मैत्री वाढवत आहे. मात्र, भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावात होती. त्यानंतर अमेरिकेने हे संबंध सुधारण्याकरिता प्रयत्न केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना कायमच दिसतात. मात्र, यादरम्यानच अमेरिकेची दुटप्पी भूमिका कायम दिसते. पाकिस्तानला हाताशी धरून भारत आमचा चांगला मित्र आहे, म्हणायचे. अमेरिकेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा पुढे आला. एकीकडे भारताचे काैतुक करायचे तर दुसरीकडे थेट पाकिस्तानला जवळचा मित्र म्हणायचे. पाकिस्तानसोबतची मैत्री अमेरिकेला चांगलीच भारी पडणार आहे.

सिंगापुर येथील शांगरी ला डायलॉगमध्ये एकाच मंचावर अमेरिकेचे रक्षा मंत्री पीट हेगसेथ यांनी भारताचे काैतुक केले, त्यानंतर पाकिस्तानचेही काैतुक केले. भारताबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, भारतीय सशस्त्र दल आधुनिकीकरण करत आहे. विशेष म्हणजे हिंद महासागरात संतुलन बनून ठेवण्याकरिता मदत करत आहेत. यादरम्याच त्यांनी पाकिस्तानचेही काैतुक केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.

हेगसेथ यांनी म्हटले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे नेतृत्व यांच्यात खरी मैत्री निर्माण झाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचे काैतुक केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्याच्या प्रयत्नांमध्ये रचनात्मक भूमिका बजावत आहे. मात्र, हेगसेथ यांच्या बोलण्याने भारतीयांना मोठा धक्का बसला.

कारण भारतातील शांतता आणि प्रदेशातील शांतता विस्कळीत करण्याचे काम पाकिस्तान करतो. मोठ्या दहशतवादी कारवाया पाकिस्तानातील दहशतवादी करतात. मात्र, अमेरिकेला हे काहीच दिसत नाहीये. उलट पाकिस्तान प्रदेशात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. जो देश कित्येक वर्षांपासून दहशतवाद वाढत आहे, त्याला अमेरिकेकडून अशाप्रकारचे काैतुक केले जाते म्हणजे हे अत्यंत धक्कादायक आहे.

Follow Us
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा