ना खेद, ना पश्चाताप..थंड डोक्याने अमेरिकेत बायकोला संपवलं, प्रेयसीला पाठवला तोच फोटो.. भारतीय इंजिनीअरच्या कृत्याने सगळेच हादरले
अमेरिकेतील भारतीय इंजिनिअर अविनाश नार्णे याला पत्नी राजिता सबिनेनीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये राजिताचा मृतदेह वॉशिंग्टनमध्ये आढळला होता. नऊ महिन्यांच्या तपासानंतर, अविनाशने नियोजनबद्ध कट रचून तिची हत्या केल्याचे उघड झाले असून, त्याचे भारतात प्रेमसंबंध होते. पत्नीच्या मृतदेहाचा फोटो प्रेयसीला पाठवल्याची कबुलीही त्याने दिली आहे.

एकीकडे सोनम रघुवंशी, सिया गोयल यांच्या क्रूर कृत्याच्या कहाण्यांनी देश हादरलाय. आपल्याच नवऱ्याला मारणाऱ्या या दोघींवर चहूबाजूंनी टीका होत्ये. दुसरीकडे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय इंजिनीअरच्या भयानक कृत्यामुळे जगच हादरलं आहे. अमेरिकेत राहून काम करणाऱ्या 30 वर्षांच्या भारतीय इंजिनीअरवर त्याच्या पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. त्याने त्याच्या बायकोची गळा आवळून हत्या केली असा पोलिसांचा आरोप आहे. मूळचा तेलंगणचा असलेला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर अविनाश नार्णे याची पत्नी, राजिता सबिनेनी, ही ऑक्टोबर 2025 मध्ये वॉशिंग्टन येथील त्यांच्या घरी मृत अवस्थेत आढळली होती. जवळपास नऊ महिने चाललेल्या सखोल तपासानंतर, पोलिसांनी अविनाश नार्णे याला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा ठपका ठेवला आहे.
त्याने अत्यंत पद्धतशीरपणे, प्लान आखून पत्नीची हत्या केली असा तपास यंत्रणांचा दावा आहे. एवढंच नव्हे तर भारतात एका अन्य महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंधही होते, असंहीलत्यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान अविनाशने कबूल केलं की पत्नीच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्या दिवशी त्याने राजिथाच्या मृतदेहाचा फोटो आपल्या प्रेयसीला पाठवला होता. आरोपी अविनाश हाँ सध्या न्यायालयीन कोठडीत असून, न्यायालयाने दोषी ठरवल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
बाथरूममध्ये सापडला पत्नीचा मृतजेह
रिपोर्टसुनार , ऑक्टोबर 2025 मध्ये बेलेव्ह्यू पोलिसांना एका व्यक्तीचा फोन आला. माझी पत्नी बाथरूममध्ये अडकली आहे आणि कोणताही प्रतिसाद देत नाहीये असं त्याने सांगितलं. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठलं आणि दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना रजीता ही जमिनीवर मृतावस्थेत आढळली. डॉक्टरांनी तिला तपासून घटनास्थळीच मृत घोषित केले. त्यावेळी या जोडप्याच्या लग्नाला अवघे सहा महिनेही पूर्ण झाले नव्हते. मात्र, तिचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झाल्याचे पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं. त्यानंतर, या प्रकरणाची अधिकृतपणे ‘हत्या’ म्हणून नोंद करण्यात आली. तपास जसजसा पुढे सरकला, तसतसा तिच्या पतीवर, अविनाश नार्णे याच्यावर पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
त्यादिवशी काय घडलं ?
अविनाश याने पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशी तो काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेला होता. जवळपास 40 मिनिटांनी तो घरी परतला. त्याच्या म्हणण्यानुसार, परत आल्यावर अविनाशला त्याची पत्नी बाथरूममध्ये आतून लॉक लावून घेतलेल्या अवस्थेत आढळली. वारंवार प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने अखेर पोलिसांना बोलावलं. ; मात्र, डिजिटल पुराव्यांवरून त्याने रचलेली ही कहाणी खोटी असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितल.
कागदपत्रांनुसार, अधिकाऱ्यांनी अपार्टमेंटच्या मुख्य दरवाजावर बसवलेली सुरक्षा सिस्टीम आणि ‘स्मार्ट लॉक’मधील माहितीची तपासणी केली. अविनाश हा काही काळासाठी घराबाहेर गेला होता हेतर रेकॉर्डवरून स्पष्ट झालं. पण तो घरी नसतान इतर कोणतीही व्यक्ती अपार्टमेंटमध् घसली नसल्याचंही त्यावरूनच दिसून आलं. म्हणजेच, एखाद्या अज्ञात हल्लेखोराने आत घुसून हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावली.
भारतात होती प्रेयसी
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांनी अविनाशचे फोन रेकॉर्ड्स, मेसेज आणि वैयक्तिक संबंधांची तपासणी केली असता, हत्येमागचे संभाव्य कारण समोर आले. न्यायालयातील कागदपत्रांनुसार, लग्नापूर्वी अविनाश नार्णे याचे भारतातील एका अन्य महिलेसोबत गुप्त प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध कायम होते आणि ती महिला या जोडप्याच्या लग्नालाही उपस्थित राहिली होती असा पोलिसांचा दावा आहे.
लग्नानंतरही अविनाश आणि त्या महिलेचं नातं कायम होतं. ज्या दिवशी अविनाशच्या पत्नीचा मृत्यू झाला, तेव्हा त्याने त्याच्या प्रेयसीला कमीत कमी 4 वेळा फोन केला होता. ज्यावेळ तो बाथरूनचं दार उघडायचा प्रय्तन करत होता, त्यावेळेसही त्याने कॉल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर अविनाश याने पत्नीला मारल्यावर तिच्या मृतदेहाचा फोटो प्रेयसीला पाठवला होता, असाही आरोप पोलिसांनी केला असून तपासादरम्यान अविनाशने या गोष्टीची कबुली दिली.