US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..
इराण आणि अमेरिकेतील ४० दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविराम घोषित झाला होता. पाकिस्तानमध्ये २१ तास चाललेल्या शांतता चर्चा मात्र अयशस्वी ठरल्या. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा आक्रमक झाले असून, इराणवर लष्करी हल्ले व होर्मुझची नाकेबंदी करण्याच्या पर्यायांवर गंभीरपणे विचार करत आहेत. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट निर्माण झाले आहे.

40 दिवसांच्या संघर्षानंतर, इराण अमेरिकेत युद्धविराम घोषित करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानमध्ये जाऊन इस्लामाबाद येथे शांततेसाठी चर्चा केली. मात्र सलग 21 तास बोलणी होऊनही काही ठोस निष्कर्ष निघाला नाही, ना एकमत झालं, त्यामुळे इराण-अमेरिकेतील ही चर्चा फिस्कटली. या दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र या अयशस्वी चर्चेनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोनाल्ड ट्रम्प पुन्हा आक्रमक झालेले दिसत आहेत. कारण ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार, हे इराणवर लष्करी हल्ले पुन्हा सुरू करण्याचा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी लादण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहेत. एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर काही तासांतच हे पाऊल उचलले जात आहे, जेणेकरून दोन्ही बाजूंमधील रखडलेला करार मोडता येईल.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) वृत्तानुसार, ट्रम्प यांनी रविवारी फ्लोरिडातील डोराल येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये सल्लागारांशी चर्चा केली आणि फॉक्स न्यूजला मुलाखत दिली. इराणशी झालेली चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर, इराणवर दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प हे विविध पर्याय शोधत आहेत. इराणच्या मोक्याच्या लक्ष्यांवर कोणत्याही क्षणी हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकन लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पडद्यामागील वाटाघाटी आता निष्फळ ठरल्या आहेत. इराणच्या अटी आणि अमेरिकेच्या मागण्या यांमधील तफावत कमी होऊ न शकल्याने, कोणतंही एकमत झालं नाही, परिणामी राजनैतिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने आता लष्करी दबाव वाढवण्याचा मार्ग अवलंबला आहे.
ट्रम्पनी पहिलेच दिले होते संकेत
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वीच असे संकेत दिले होते की जर ‘खरा करार’ झाला नाही, तर लष्करी कारवाई हाच एकमेव पर्याय असेल. त्यातच आता अमेरिका-इराणमधील वाटाघाटी फिसकटल्यामुळे, अमेरिकेचा संरक्षण विभाग, पेंटागॉन, हा संभाव्य टार्गेट्सची यादी तयार करत आहे.केवळ लष्करी बळानेच इराणला शरणागती पत्करण्यास भाग पाडले जाऊ शकते असा ट्रम्प यांचा विश्वास आहे.
मध्य पूर्वेत संकटात वाढ
दरम्यान, या अहवालाने पुन्हा एकदा मध्य-पूर्वेवर युद्धाचे सावट टाकलं आहे. बॉम्बहल्ला्याचा बातमीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आणि भू-राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर ही कारवाई सुरू झाली, तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. आता संपूर्ण जगाचं व्हाईट हाऊसकडे लक्ष असून तिथून पुढील अधिकृत घोषणा काय होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.