AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US Ceasefire : इराणसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले, अमेरिकेला माघार घ्यायला लावणाऱ्या 10 अटी कोणत्या?

अमेरिका-इराण युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या १० अटींची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. या अटींमुळे मध्यपूर्वेतील गणिते कशी बदलणार आणि इस्लामाबादमधील चर्चेत काय निष्पन्न होणार, याची माहिती समोर आली आहे.

Iran-US Ceasefire : इराणसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले, अमेरिकेला माघार घ्यायला लावणाऱ्या 10 अटी कोणत्या?
US-Iran Conflict
| Updated on: Apr 08, 2026 | 7:43 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला टोकाचा संघर्ष तूर्तास थांबला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारे हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतर या युद्धविरामाला अमेरिकेकडून सहमती दर्शवली आहे. आता दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे इराणने दिलेल्या १० अटी अमेरिकेने मान्य केल्याचा दावा इराणकडून केला जात आहे. आता या अटी नेमक्या कोणत्या त्याची माहिती समोर आली आहे.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनुसार, इराणने अमेरिकेसमोर एक १०-कलमी योजना म्हणजेच काही अटी ठेवल्या होत्या. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने या अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे हा इराणचा मोठा विजय आहे. इराणच्या सरकारी मीडियानेही याचे जोरदार स्वागत केले आहे. या अटींमध्ये इराणचे वर्चस्व सिद्ध करणारे अनेक मुद्दे आहे.

इराणकडून अमेरिकेला देण्यात आलेल्या १० अटींचा प्रस्ताव

  1. अमेरिका इराणवर कोणताही लष्करी हल्ला करणार नाही.
  2. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) इराणचे पूर्ण नियंत्रण कायम राहील.
  3. इराणला स्वतःच्या अणूप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धन करण्याची अधिकृत मान्यता मिळेल.
  4. अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध तात्काळ हटवले जातील.
  5. इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवर लादले जाणारे सर्व दुय्यम निर्बंधही रद्द केले जातील.
  6. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) इराणविरुद्ध मंजूर केलेले सर्व जुने प्रस्ताव रद्द केले जातील.
  7. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) नियामक मंडळाने इराणविरुद्ध दिलेले सर्व आदेश मागे घेतले जातील.
  8. युद्धाच्या तणावामुळे आणि निर्बंधांमुळे इराणचे जे आर्थिक नुकसान झाले, त्याची भरपाई दिली जाईल.
  9. अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या तळांवरून सैन्य मागे घ्यावे.
  10.  केवळ इराणच नाही, तर हिजबुल्लाह आणि इराणशी संबंधित इतर गटांविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेने आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी थांबवावी.

युद्ध कायमचे थांबणार की पुन्हा भडकणार

दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम जाहीर झाला असला, तरी जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली नाही. ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागणे सुरूच ठेवले आहे. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले रोखले आहेत. इराणमध्ये सामान्य नागरिक अजूनही अणूप्रकल्पांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून अमेरिकेचा निषेध करत आहेत. तसेच इराणने संयुक्त अरब अमिरातीसारख्या (UAE) देशांमधील अमेरिकन तळांनाही लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. आता येणाऱ्या दोन आठवड्यांत इस्लामाबाद होणाऱ्या चर्चेनंतर हे युद्ध कायमचे थांबणार की पुन्हा भडकणार, याबद्दलचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे.

Follow Us
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय