US-Iran War: होर्मुझवरून ट्रम्प यांनी आपल्याच मित्राला दिली धमकी,’जर मध्ये पडला, तर तुमच्यावरही बॉम्ब टाकू
इराणने कोणत्याही स्थिती अण्वस्रे तयार करु नये असे आमचे ध्येय्य आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे वक्तव्य अशा क्षणी आले आहे जेव्हा चर्चेसाठीचा ६० दिवसांचा अवधी संपला आहे. वॉशिंग्टन आणि तेहराण यांनी ही चर्चा पुढे चालवायची की नाही वा मतभेद मिठवायचे का ? यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून युद्ध सुरु आहे, आता हे युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या सहकारी देश ओमानला बॉम्बहल्ल्याची धमकी दिली आहे. ही धमकी अशा वेळी देण्यात आली आहे, ज्यावेळी इराण आणि ओमान होर्मुझ स्ट्रेटमधून जहाजांना मार्ग देण्यासाठी अंतरिम सामंजस्य करार करण्यासाठी चर्चा करत आहेत.
Fox News ला दिलेल्या एका फोन मुलाखतीत ट्रम्प यांनी जर ओमान इराणी जहाजांच्या नाकाबंदीच्या मार्गात येईल तर अमेरिका त्याच्यावर हल्ला करले. ट्रम्प यांनी सांगितले की नाकाबंदीने इराणवर दबाव बनलेला आहे आणि युद्ध संपवण्याच्या घाईत आम्ही नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
सहा महिन्यांपासून अमेरिका-इराण युद्ध
अमेरिका-इराणच्या युद्धाला सहा महिने झाले असून अजूनही तोडगा निघालेला नाही. शांतता करार रखडला आहे आणि अधून-मधून होणाऱ्या हल्ल्याने तणाव कायम आहे.याचा परिणाम होर्मुझ स्ट्रेटमधून कच्चा तेलाची आणि अत्यावश्यक वस्तूंची येजा होण्यावर मर्यादा आली आहे. होर्मुझ मार्ग हा जगातील तेलाच्या होणाऱ्या एकूण व्यापाराच्यासुमारे पाचवा हिस्सा आहे.
होर्मुझवरुन घमासान…
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने होर्मुझ स्ट्रेटने तत्काळ बंद करुन टाकली. अमेरिकेला या होर्मुझची वाहतूक सुरु राहावी अशी व्यवस्था हवी आहे. अमेरिका इराणी बंदरावर लावलेली आपली नाकाबंदी हटवण्याच्या आधी जहाजांची वाहतूक सुरु करु इच्छीत आहे. या मुद्द्यावर इराण आणि ओमान याच्या दरम्यान काही आठवडे बातचीत सुरु आहे.
इराण राजकर्ते आता ओमान सोबत होर्मुझ स्ट्रेटमध्ये जहाजांची वाहतूक सुरु करण्यासाठी एक अंतरिम व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणने सोमवारी सांगितले की दोन्ही देश एक संयुक्त वक्तव्य आणि प्रस्तावित व्यवस्थेला अंतिम रुप देण्यासाठी काम करत आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांच्या मते जहाज कोणत्या मार्गाने जावीत या संदर्भात दोन्ही पक्षात सहमती झाली आहे.मात्र याची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. प्रस्तावित व्यवस्थेत जहाजांकडून कोणतेही शुल्क न घेण्याचे देखील ठरले आहे.
ओमानवर का भडकले ट्रम्प?
अमेरिका नाकाबंदी द्वारे इराणवर दबाव कायम ठेवू इच्छीत आहे. दुसरीकडे ओमान इराणसोबत मिळून जहाजांची येजा करण्याच्या व्यवस्थेवर चर्चा करत आहे. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओमानला धमकी दिली आहे की जर तो आमच्या मार्गात येईल तर अमेरिका त्याच्यावरही सैन्य कारवाई करेल.
गाझावरुन संघर्ष सुरूच
इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गाझासंदर्भातही चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांचे जावई आणि अमेरिकेचे मध्य-पूर्व वाटाघाटीकार जेरेड कुशनर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आहे.त्याच्या एक दिवस आधी, कुशनर यांनी शस्रे खाली टाकण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी इजिप्तमध्ये हमासचे नेते खलील अल-हय्या यांची भेट घेतली होती. ही चर्चा अमेरिकेच्या वतीने तयार केलेल्या १५-कलमी योजनेवर आधारित आहे. हमासने प्रस्तावित योजनेला तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे इस्रायलने आधी शस्र समर्पण करीत माघार घ्या नंतरच आमचे सैन्य मागे घेऊ असा आग्रह धरला आहे. त्यामुळे युद्ध भडकण्याची लक्षणे दोन्ही बाजूंनी आहेत.