Dubai AirPort : दुबईवर अजूनही इराणकडून हल्ले होत आहेत का? एअरपोर्ट आणि फ्लाइट्सची काय स्थिती? जाणून घ्या

Dubai AirPort : अबू धाबी आणि दुबईच्या अन्य भागातही UAE ने इंटरसेप्ट केलेला ड्रोनचा ढिगारा पडला. त्यात काही लोक जखमी झाले. सोबतचं घरं आणि इन्फ्रास्ट्रक्चरच काही प्रमाणात नुकसान झालं.

Dubai AirPort : दुबईवर अजूनही इराणकडून हल्ले होत आहेत का? एअरपोर्ट आणि फ्लाइट्सची काय स्थिती? जाणून घ्या
Iran Attack Dubai
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 02, 2026 | 9:41 AM

इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर पश्चिम आशियामध्ये तणाव खूप वाढला आहे. इराणकडूनही प्रत्युत्तराची कारवाई सुरु आहे. संयुक्त अरब अमिरातसह अनेक शेजारी देशांवर हल्ले केले आहेत. UAE ची राजधानी दुबईवरही शनिवारी हल्ले झालेत. इराणच्या हल्ल्यात फाईव्ह स्टार हॉटेलचं नुकसान झालं. सर्वात चर्चित बुर्ज खलिफा टॉवरलाही धोका आहे. या हल्ल्यामुळे दुबईच्या प्रतिष्ठेचं मोठं नुकसान झालं आहे. दिलासा देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे स्वप्नांच्या या नगरीवर सध्या कुठला हल्ला झालेला नाही. जगातील सर्वात सुंदर, सुरक्षित, स्वप्नांचं आणि टॅक्स फ्री शहर म्हणून दुबई सिटी ओळखली जाते. शनिवारी इराणकडून दुबईवर हल्ले झाले. अनेक ठिकाणी धुरांचे लोळ दिसले. मध्य पूर्वेत शनिवारी सुरु झालेल्या यु्द्धाचे परिणाम आखातामध्ये उमटले आहेत.

रविवारी दुसऱ्यादिवशी बहरीनची राजधानी मनामा आणि कतरची राजधानी दोहासह दुबईतही स्फोटाचे आवाज ऐकू आले. त्यामुळे या भागातील लोक दहशतीखाली आहेत. 1.1 कोटी लोकसंख्या असलेल्या दुबईत 90 टक्के लोक परदेशी आहेत. इराणने डागलेलं ड्रोन हवेतच इंटरसेप्ट केलं. पण त्या ड्रोनचा ढिगारा अबू धाबीच्या एतिहाद टॉवर्स कॉम्प्लेक्सला धडकला. त्यात एक महिला आणि मुलगा जखमी झाला. सोबतच इमारतीचं थोडं नुकसान झालं. UAE च्या एअर डिफेन्स सिस्टिमने रविवारी रात्री शत्रुचं एक ड्रोन यशस्वीरित्या इंटरसेप्ट केलं. त्यावेळी ही घटना घडली.

UAE मध्ये तीन लोकांचा मृत्यू

अबू धाबी आणि दुबईच्या अन्य भागातही UAE ने इंटरसेप्ट केलेला ड्रोनचा ढिगारा पडला. त्यात काही लोक जखमी झाले. सोबतचं घरं आणि इन्फ्रास्ट्रक्चरच काही प्रमाणात नुकसान झालं. मागच्या दोन दिवसात इराणी हल्ल्यात UAE मध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. यात पाकिस्तानी, नेपाळी आणि बांग्लादेशी नागरिक आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक अमिरातच्या नागरिकांसह इजिप्त, इथोपिया, फिलिपिनो, पाकिस्तानी, इराणी, भारतीय, बांग्लादेशी, अजरबैजान, येमेन, युगांडा. इरिट्रिया, लेबनॉन आणि अफगाणिस्तानसह अनेक देशांचे नागरिक जखमी झाले आहेत.

एअरपोर्टवर पोहोचण्याआधी आपलं फ्लाइट स्टेटस चेक करा

इराणकडून होत असलेल्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना थेट एअरपोर्टवर जाणं टाळण्याच्या थेट एअरलाइन्स कंपनीशी संपर्क करण्यास सांगितलं आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर या भागातील एअर स्पेस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अबू धाबी इंटरनॅशनल एअरपोर्टसह मिडिल ईस्टच्या वेगवेगळ्या एअरपोर्टवर लाखो प्रवासी अडकून पडले आहेत. मोठ्या एअरलाइन्स कंपन्यांनी प्रवाशांना एअरपोर्टवर पोहोचण्याआधी आपलं फ्लाइट स्टेटस चेक करायला सांगितलं आहे.

 

Follow Us