US Midterm Elections 2026: अमेरिकेत मतदान होताच डोनाल्ड ट्रम्प यांची धमक्यांना सुरूवात, पुन्हा युद्ध सुरू होणार?, थेट..
US Midterm Elections 2026: अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधी सभेच्या सर्व ४३५ आणि सिनेटच्या १०० पैकी ३३ जागांवर निवडणूक होत आहे. रिपब्लिकन पक्ष काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये आपले अल्प बहुमत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पची आज मोठी परीक्षा आहे. मंगळवारी सुरू झालेल्या मिडटर्म निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया संपली आहे. आता सर्वांच्या नजरा निकालांवर खिळल्या आहेत. बुधवार सकाळी नॉर्थ कॅरोलिना, ओहायो आणि जॉर्जिया सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदान संपल्यानंतर आता सुरुवातीचे निकाल येऊ लागले आहेत. या निकालांमध्ये ट्रम्पला धक्का बसत असल्याचे दिसत आहे. जाणकारांच्या मते, इराण युद्धामुळे महागाईचा फटका बसलेल्या अमेरिकन जनतेचा राग ट्रम्पवर भारी पडू शकतो.
काही सुरुवातीच्या निकालांबद्दल बोलायचे झाले तर ‘डिसीजन डेस्क एचक्यू’नुसार जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक सिनेटर जॉन ओसॉफने आपली जागा जिंकली आहे. ओसॉफने ट्रम्पवर राष्ट्रपती पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचा आरोप आधीच केला होता. आता त्यांच्या विजयाने सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या नियंत्रणाच्या शक्यता वाढवल्या आहेत. याशिवाय साउथ कॅरोलिना, फ्लोरिडा, न्यू हॅम्पशायर, व्हर्जिनिया आणि केंटकीमध्येही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि लवकरच निकाल समोर येतील.
कोणाकडे किती ताकत?
सांगायचे झाले तर अमेरिकेत राष्ट्रपतीचा कार्यकाळ ४ वर्षांचा असतो. या ४ वर्षांच्या कालावधीच्या मध्यभागी मिडटर्म निवडणुका होतात. यामध्ये राष्ट्राध्यक्षपदाची जागा पणाला लागलेली नसते, तर अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर कोणाचे नियंत्रण असेल हे ठरवले जाते.सध्याच्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधी सभेच्या सर्व ४३५ आणि सिनेटच्या १०० पैकी ३३ जागांवर निवडणूक होत आहे. तर ३६ राज्यांमध्ये गव्हर्नर पदासाठीही मतदान होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत
एकीकडे रिपब्लिकन पक्ष काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये आपले अल्प बहुमत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डेमोक्रॅट एक किंवा दोन्ही सभागृहांमध्ये नियंत्रण मिळवू इच्छितात. सध्या दोन्ही सभागृहांवर डोनाल्ड ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकनकडे ५३, डेमोक्रॅट्सकडे ४७ जागा आणि निर्दलीयंकडे २ जागा आहेत. तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्समध्ये रिपब्लिकनकडे २१८ आणि डेमोक्रॅट्सकडे २१४ जागा आहेत.