AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पागल झाले आहेत.. डोनाल्ड ट्रम्प भयंकर चिडले, थेट नेतन्याहू यांना फोन करून सुनावले, इराणकडून धमकी..

इराण आणि अमेरिका युद्धात इस्त्रायलने असे काही केले की, युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आहे. फक्त हेच नाही तर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची चर्चाही बंद होऊ शकते. जगाला ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे.

तुम्ही पागल झाले आहेत.. डोनाल्ड ट्रम्प भयंकर चिडले, थेट नेतन्याहू यांना फोन करून सुनावले, इराणकडून धमकी..
Donald Trump Benjamin Netanyahu call
| Updated on: Jun 02, 2026 | 8:10 AM
Share

28 फेब्रुवारी 2026 हा दिवस जगासाठी काळा ठरला. याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत मोठा हल्ला इराणवर केला. आता या युद्धाला सुरू होऊन 3 महिने होऊन गेली. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्धविराम होण्याऐवजी युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच अमेरिकेने युद्धात थोडी माघार घेतली. मात्र, इस्त्रायल आक्रमक भूमिका घेत आहे. इस्त्रायलच्या या आक्रमक भूमिकेने सर्वकाही सत्यानाश होताना दिसतोय. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच इस्त्रायलने खेळ खंडोबा केला. होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणने थेट युद्धविराम चर्चा न करण्याची धमकीच दिली. ही धमकी एकट्या अमेरिकेला नाही तर सर्व जगाकरिता भारी पडू शकते. दुसरीकडे इस्त्रायलचे हे रूप पाहून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून मोठा संताप व्यक्त केला.

फक्त संतापच नाही तर त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, जर मी नसतो तर तुम्ही आता जेलमध्ये असता. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना बोलताना काही चुकीचे शब्दही वापरले. इस्त्रायलने बेरूत येथील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. ज्यानंतर इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्याचा इशारा दिला. एक्सियोसच्या रिपोर्टनुसार, नेतन्याहू यांना फोनवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प खूप जास्त रागात होते.

त्यांनी नेतन्याहू यांना हिज्बुल्लाहवरील हल्ले ताबडतोब थांबवण्यास सांगितले. अमेरिकेतील अधिकाऱ्याने एक्सियोसला बोलताना म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना म्हटले की, तुम्ही पूर्णपणे पागल झाले आहेत… जर मी नसतो तर ना तुम्ही आता जेलमध्ये असता… मी तुम्हाला वाचवले आहे. सध्याच्या घडीला प्रत्येकाला तुमचा राग येत असून त्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. तुम्ही जे करत आहात त्यामुळे सर्वजण इस्त्रायलची नफरत करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली नाराजी थेटपणे जाहीर केली. कोणत्याही परिस्थिती हल्ले थांबवण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, इस्त्रायलकडून हल्ले सुरूच ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची पोस्टही नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर शेअर केली. लेबनानमधील कारवाई सुरूच राहणार आहे. माझे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे झाल्याचेही त्यांनी म्हटले. थोडक्यात काय तर नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला फाट्यावर मारले.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात