AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज होणार युद्धबंदी करार? डोनाल्ड ट्रम्प यांची काही वेळातच पलटी, जगापुढे..

US Israel Iran War : इराण आणि अमेरिका युद्धात कधी काय होईल, याचा भरोसा नाही. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला पुन्हा एकदा 48 तासाचा वेळ देण्यात आला. मात्र, इराण अजूनही उभा आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. जग या युद्धात होरपळत आहे.

आज होणार युद्धबंदी करार? डोनाल्ड ट्रम्प यांची काही वेळातच पलटी, जगापुढे..
Donald Trump
| Updated on: Apr 06, 2026 | 10:57 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका एक महिन्यापासून उडाला आहे. युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता आणि युद्धबंदीकरिता अमेरिकेने इराणला 48 तासाचा वेळ दिला. होर्मुज खाडी खुली करा नाही तर नरकात जा असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन मुदत जाहीर केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, मंगळवारी रात्री 8 वाजेच्या अगोदर… या नवीन मुदतीने तेहरानला अमेरिकेच्या नेत्याला समजवण्याकरिता वेळ दिला. त्यानंतर पुन्हा बुधवारी 5.30 वाजेपर्यंतचा वेळ वाढून देण्यात आला. मात्र, या दोन्ही वेळची इराणने मजाक उडवली. आज युद्धबंदी करार होऊ शकतात, असा अंदाज ट्रम्प यांचा आहे. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानताना दिसत नाही. अमेरिकाच इराणला वेळ देत आहे. 48 तासानंतर इराणवर घातक हल्ले करू आणि सर्वकाही विनाश करू अशी थेट धमकी देण्यात आली.

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले करण्याची धमकी दिली. यापूर्वीच इराणने म्हटले आहे की, तुम्ही आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले तर आम्ही प्रदेशात असलेल्या सर्व अमेरिकन कंपन्यांवर हल्ले करू. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या धमकीनंतर काही तासाच पुन्हा एकदा इराणला वेळ वाढून दिल्याचे बघायला मिळाले. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाचा दबाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे. शिवाय जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकेच्या जनतेला संबोधित केल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.

वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी नवीन वेळापत्रकाची पुष्टी केली.डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही खूप जास्त मजबूत स्थितीत आहोत. इराणला देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी 20 वर्षे लागतील. हा दावा जरी डोनाल्ड ट्रम्प यांचा बरोबर असला तरीही वस्तूस्थिती ही देखील आहे की, या युद्धाच्या झळा अमेरिकेला लागत असून अमेरिकेत महागाई वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लोकांचा रोष वाढत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक