AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला 150 वेळा नष्ट करू शकते अमेरिका… डोनाल्ड ट्रम्प यांची खतरनाक धमकी, थेट सांगितली फाडफाड आकडेवारीच..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच काही नियम नाही. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर जगात एकच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

जगाला 150 वेळा नष्ट करू शकते अमेरिका... डोनाल्ड ट्रम्प यांची खतरनाक धमकी, थेट सांगितली फाडफाड आकडेवारीच..
US President Donald Trump nuclear weapons
| Updated on: Nov 03, 2025 | 2:19 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगणे फार जास्त कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच आदेश देत थेट अण्वस्त्र चाचण्या करण्यास सांगितले. यामुळे जगात एकच खळबळ उडाली. जे देश काही दिवसांपूर्वी जगातील अनेक देशांवर अण्वस्त्र चाचण्या न करण्यासाठी दबाव टाकत होते तेच आता थेट आदेश देऊन अण्वस्त्र चाचण्या करण्यास सांगत आहेत. संपूर्ण जग विनाशाकडे जाताना यावरून स्पष्ट दिसतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिका पुन्हा अणुचाचणी सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, रशिया, चीन आणि उत्तर कोरिया त्यांच्या अणुकार्यक्रमांवर काम करत आहे, मग आपणच का मागे राहायचे.

सीबीएस न्यूजला नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते याबद्दल बोलताना दिसले. ट्रम्प यांनी म्हटले की, आपल्याकडे जगाला 150 वेळा नष्ट करण्यासाठी पुरेशी अणुशक्ती आहे. रशिया आणि चीनकडे देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आपला देश एकमेंव आहे की, आपण चाचण्या करत नाहीत. अमेरिका फक्त संयम दाखवण्याचे धोरण करत आहे तर इतर देश कमकुवत समजू लागली आहेत.

मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, चीन आणि उत्तर कोरिया सतत अणुकार्यक्रम करत आहेत. सामरिक संतुलन बिघडेल म्हणून फक्त अमेरिका गप्प आहे. या मुलाखतीच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला ताबडतोब अनुचाचणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. रशियाने देखील अमेरिकेसोबतचा अणु चाचण्याचा करार तोडला आहे. यानंतर अमेरिका देखील अॅक्शन मोडवर आलीये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त चीनच नाही तर उत्तर कोरियावरही गंभीर आरोप केला आहे. यादरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही रशिया आणि चीनशी निःशस्त्रीकरणाबद्दल बोलत आहोत. मात्र, दोन्ही देश चाचण्या सातत्याने घेत आहेत. मग प्रश्न पडतो की, मग आम्हीच का मागे राहायचे? हेच नाही तर मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, उत्तर कोरिया हा दर महिन्याला चाचण्या करत आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...