मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, माझा पारा चढतो आणि मग…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या अधिसूचनेवर आता सह्या देखील झाल्या आहेत. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. त्यामध्येच आता त्यांनी नवा मोठा खुलासा केला आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, माझा पारा चढतो आणि मग...
Donald Trump
| Updated on: Aug 26, 2025 | 1:41 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. त्यांनी टॅरिफच्या अधिसूचनेवर सह्या देखील केल्या. हा भारतासाठी अत्यंत मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल. त्यामध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले.  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्या भेटीबद्दल त्यांनी भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भेटीबद्दल बोलताना थेट म्हटले की, पुतिन यांना जेलेंस्की हे आवडत नाही. थेट दोघांच्या भेटीबद्दल त्यांनी भाष्य केले. ट्रम्प म्हणाले की, गेल्या आठवड्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पुतिन यांच्याशी माझी आतापर्यंत प्रत्येक चर्चा चांगली झाली आहे. मात्र, त्यानंतर कुठेतरी बॉम्ब पडतो आणि मग माझा पारा चढतो. हेच नाही तर त्यांनी पुढे म्हटले की, हे युद्ध थांबेल…पण नक्कीच हे सोपे काम नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन आणि जेलेंस्की यांच्या समोरासमोरील चर्चेवर बोलताना म्हटले की, मला माहिती नाही, कदाचित ते भेटू शकतात किंवा नाही. गेल्याच आठवड्यात पुतिन यांना ट्रम्प यांनी फोन केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी थेट चेतावणी देत दोन्ही देशांना मोठा इशारा देत म्हटले होते की, पुतिन आणि जेलेंस्की यांना समोरासमोर येऊन चर्चा करावी लागणार आहे. जर यांनी असे केले नाही तर त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. मात्र, पुतिन किंवा जेलेंस्की या दोन्ही देशांच्या नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला फार काही गांर्भियाने घेतले नाही. उलट त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रसिद्ध दिला नाही.

मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांना धमकावताना दिसत आहेत. हेच नाही तर रशियाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम टाकण्यासाठी आपण भारतावर टॅरिफ लावत असल्याचे त्यांनी म्हटले. भारत कच्चे तेल खरेदी करून रशियाला मोठ्या प्रमाणात पैसा देत आहे आणि याच पैशातून रशिया युक्रेन विरोधात युद्ध लढत असल्याचा दावा अमेरिकेने केला.