AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार, चीनच्या भूमिकेने दणका, थेट इराणविरोधात देणार अमेरिकेची साथ? मोठा दावा..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही कमी होत नाही. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेची इराणविरोधात साथ देण्यास चीन तयार असल्याचे सांगितले जातंय. अमेरिकेने म्हटले की, चीन आम्हाला बोलण्यास इच्छुक आहे.

जगात हाहाकार, चीनच्या भूमिकेने दणका, थेट इराणविरोधात देणार अमेरिकेची साथ? मोठा दावा..
US and China
| Updated on: Sep 04, 2026 | 8:36 AM
Share

इराणवर आर्थिक दबाव टाकण्यासाठी अमेरिका प्रत्येक प्रयत्न करत आहे. कोणत्याही देशाने इराणसोबत व्यापार केला तर त्या देशावर निर्बंध लादली जातील, असे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी चीनबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इराणसोबतच्या युद्धात चीन आपली साथ देत असल्याचे मोठे विधान त्यांनी केले. व्हान्स यांनी सांगितले की, इराणला आर्थिकदृष्ट्या वेगळे पाडण्याच्या प्रयत्नांमध्ये चीनही अमेरिकेची साथ देण्यास तयार आहे. अमेरिकेच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. चीन आणि इराण यांच्यात दरवर्षी मोठा व्यापार होतो. इराणचे तेल चीन खरेदी करतो. मात्र, आता खरोखरच चीन अमेरिकेची साथ देणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, अमेरिकेने चीनला दिलेल्या प्रस्तावापैकी सर्वच गोष्टी मानण्यास चीन तयार नाही.

म्हणजे काही गोष्टींवर चीनची भूमिका वेगळी आहे. जे.डी. व्हान्स यांना विचारण्यात आले की, चीनच्या मदतीशिवाय इराणला आर्थिकदृष्ट्या वेगळे पाडण्याची अमेरिकेची मोहीम यशस्वी होऊ शकेल का? यावर बोलताना त्यांनी म्हटले की, या मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा करण्यास चीन इच्छुक आहे. पण त्यांना अमेरिकेच्या सर्वच अटी मान्य नाहीत.

जे.डी. वान्स यांनी एक महत्वाची गोष्ट मान्य केली. त्यांनी म्हटले की, अमेरिका आणि चीन यांच्यात धोरणात्मक मतभेद आहेत. दोन्ही देशांची हितसंबंधे एकसारखी नक्कीच नाहीत. पण डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे संबंध खूप जास्त चांगले आहेत. आंतरराष्ट्रीय वादांमध्ये व्यापारी जहाजांना टार्गेट करणाऱ्या देशांच्या तुलनेत बीजिंग अधिक जबाबदारीने वागत आहेत.

इराणबाबत त्यांना आमच्याशी चर्चा करायची आहे. पण त्यांना काही गोष्टी मान्य नाहीत. आम्ही त्यावर चर्चा करू. पण यात अमेरिकेची साथ देण्यास नक्कीच चीन तयार आहे. आता अमेरिकेमधून आलेल्या या विधानाने इराणचे टेन्शन वाढले आहे. खरोखरच अमेरिकेची साथ चीन देणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर चीनने अमेरिकेची साथ दिली तर एक वेगळे समीकरण तयार होईल.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी