मोदींना पाहताच जपानमध्येही वंदे मातरम् आणि 'जय श्री राम'च्या घोषणा

मोदींना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भारतीयांनी हजेरी लावली. यावेळी वंदे मातरम आणि जय श्री रामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोदींना पाहताच जपानमध्येही वंदे मातरम् आणि 'जय श्री राम'च्या घोषणा

टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 समिटसाठी जपान दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी कोबे शहरात भारतीय समुदायाला संबोधित केलं. मोदींना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भारतीयांनी हजेरी लावली. यावेळी वंदे मातरम आणि जय श्री रामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जपान आणि भारत संबंधांवर प्रकाश टाकत मोदींनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भारताचा विकास कसा करु शकतो याबाबत मार्गदर्शन केलं.

सात महिन्यांनी मला पुन्हा एकदा इथे येण्याची संधी मिळाली याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा एक निव्वळ योगायोग आहे की, मागच्या वेळी मी आलो तेव्हा नुकताच निकाल लागला होता आणि माझे मित्र शिंजो आबे (जपानचे पंतप्रधान) यांना तुम्ही निवडून दिलं होतं. यावेळी आलो असताना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने मला पुन्हा एकदा प्रधान सेवक म्हणून संधी दिली. लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दलही मोदींनी माहिती दिली. सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत देण्याची इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, असं ते म्हणाले.

भारत सब का साथ, सब का विकास या सूत्रानुसार पुढे जात आहे, असंही मोदींनी सांगितलं. पुढच्या पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दीष्ट आहे. सर्व भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहोत. सामाजिक क्षेत्र ही आमची प्राथमिकता असेल. शिवाय पायाभूत सुविधांकडेही लक्ष द्यायचंय, असंही त्यांनी सांगितलं.

भारत आणि जपान संबंधांबाबतही मोदींनी प्रकाश टाकला. जागतिक संबंधांची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा जपान हा एक जवळचा मित्र म्हणून दिसतो. हे संबंध आजचे नसून जुने आहेत. या संबंधांमध्ये एकमेकांविषयी सांस्कृतीक जिव्हाळा आणि आदर आहे, असंही मोदी म्हणाले.

भारताच्या डिजीटल क्षेत्रातील प्रगती आणि वाटचालीविषयी देखील मोदींनी माहिती दिली. देशात डिजीटल व्यवहार वेगाने वाढत असून याबाबतची जागरुकताही वाढत आहे. भारत आता अंतराळात प्रगती करत असून चंद्रयान 2 लवकरच लाँच केलं जाणार आहे. 2022 मध्ये ‘गगनयान’ तर जाईलच, पण आपण स्वतःचं स्पेस स्टेशन निर्माण करण्याच्याही प्रयत्नात आहोत, असं मोदींनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *