AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शी जिनपिंग यांच्यासमोर डोनाल्ड ट्रम्पचं सैन्य झुकलं, थेट गुडघ्यावर बसून…, अमेरिकेत संताप, Video

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओमुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शी जिनपिंग यांच्यासमोर डोनाल्ड ट्रम्पचं सैन्य झुकलं, थेट गुडघ्यावर बसून..., अमेरिकेत संताप, Video
Xi JinpingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 9:10 PM
Share

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वर्दी घातलेले अमेरिकेचे सैनिक गुडघ्यावर बसून चीनच्या राष्ट्राध्यक्षांसाठी टाकलेल्या रेड कार्पेटला व्यवस्थित करताना दिसत आहेत. ही घटना जॉइंट बेस एड्रयूज येथील आहे. जिथे शी जिनपिंग यांचं विमान लँड झालं. जॉइंट बेस एड्रयूज हे एक अमेरिकेन सैन्याचं प्रमुख विमानतळ आहे. हे विमानतळ प्रिंन्स जॉर्ज काउंटीमध्ये स्थित आहे. हे विमानतळ अमेरिकेची राजधानी वाशिंग्टनपासून 10 मैल दक्षिण पूर्वेला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

हा एक बारा सेकंदाचा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चीनेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आपल्या विमानातून बाहेर पडण्यापूर्वी अमेरिकेचे अनेक सैनिक गुडघ्यावर बसून हाताने शी जिनपिंग यांच्यासाठी टाकलेलं रेड कार्पेट साफ करताना दिसत आहेत. शी जिनपिंग यांच्या स्वागतासाठी अमेरिकेनं 98 फूट लांबीचं रेड कार्पेट अंथरलं होतं. त्याचवेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि मंत्रालयाचे प्रोटोकॉल प्रमुख हांग लेई यांच्यासह चीनी अधिकारी विमानाच्या खिडकीमधून अमेरिकेच्या सैन्याला पहात असल्याचं दिसून येत आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओवरून अमेरिकन नागरिकांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्याचं पहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडली अमेरिकेची परंपरा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासाठी राष्ट्राध्यक्षांची परंपरा देखील मोडली आहे. आपल्या देशात आलेल्या एखाद्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती हे 1962 नंतर पहिल्यांदाच विमानाजवळ पोहोचले आहेत. 1962 साली अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ कॅनडी यांनी याच पद्धतीने ब्रिटनचे पंतप्रधान हेरोल्ड मॅकमिलन यांचं स्वागत केलं होतं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अमेरिकेची प्रथम महिला मेलानिया ट्रम्प या देखील होत्या. दोघांनी विमानाच्या पायऱ्याजवळ उभा राहून शी जिनपिंग यांचं स्वागत केलं. शी जिनपिंग यांच्या स्वागतावेळी दोन बी-1 बॉम्ब वर्षाव करणारे विमानं, सहा एफ-16 आणि सहा 1962 लढाऊ विमानांनी उड्डाण केलं. अमेरिकेमध्ये शी जिनपिंग यांचं अत्यंत जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांना यावेळी 21 तोफांची सलामी देखील देण्यात आली.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा