VIDEO : पाच वर्षीय चिमुकलीची झोपेत 11 व्या मजल्यावरुन उडी आणि...

बँकॉक : झोपेत चालण्याच्या आजाराबाबत आपण ऐकलं असेल. सध्या अशाच एका झोपेत चालण्याऱ्या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पाच वर्षांच्या या चिमुकलीने झोपेत हॉटेलच्या खोलीचं दार उघडलं आणि बाल्कनीत येऊन चक्क अकराव्या मजल्याहून खाली उडी घेतली. आश्चर्य म्हणजे अकराव्या मजल्याहून पडूनही या मुलीचे प्राण वाचले आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थायलंडचा …

VIDEO : पाच वर्षीय चिमुकलीची झोपेत 11 व्या मजल्यावरुन उडी आणि...

बँकॉक : झोपेत चालण्याच्या आजाराबाबत आपण ऐकलं असेल. सध्या अशाच एका झोपेत चालण्याऱ्या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पाच वर्षांच्या या चिमुकलीने झोपेत हॉटेलच्या खोलीचं दार उघडलं आणि बाल्कनीत येऊन चक्क अकराव्या मजल्याहून खाली उडी घेतली. आश्चर्य म्हणजे अकराव्या मजल्याहून पडूनही या मुलीचे प्राण वाचले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थायलंडचा आहे. ही चिमुकली तिच्या वडिलांसोबत थायलंडच्या पट्टाया येथे पार्टीसाठी आलेली होती. त्यानंतर ते रात्रभरासाठी पट्टायाच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांची खोली 12 व्या मजल्यावर होती.

रात्रीच्या वेळी ही चिमुकली झोपेत खोलीच्या बाहेर पडली. त्यानंतर खोली आतून लॉक झाली. त्यामुळे ती खोलीत शिरु शकत नव्हती. त्यानंतर तिने 12 व्या मजल्यावरच्या अनेक खोल्यांचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या खोल्याही बंद होत्या. त्यामुळे ती 11 व्या मजल्यावर आली. तिथेही तिने एका खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दार उघडत नसल्याने ती 11 मजल्याच्या बाल्कनीच्या रेलिंगवर चढली आणि रेलिंगला लटकली. मात्र, तिचा हात रेलिंगवरुन सुटला आणि ती थेट 11 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. हा सर्व थरारक प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हॉटेलमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. तेव्हा त्यांना ही चिमुकली बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी लगेच तिला पट्टायाच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यासोबतच तिच्या वडिलांनाही या दुर्घटनेबाबत कळवण्यात आलं. 11 व्या मजल्यावरुन पडूनही ही चिमुकली सुदैवाने बचावली आहे. पण तिला काही गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. तिचा पाय आणि हात तुटला आहे, तसेच तिच्या पाठीलाही दुखापत झाली आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

या पाच वर्षांच्या चिमुकलीचा झोपेत चालताना 11 मजल्यावरुन पडण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर या घटनेसाठी तिचे आई-वडील जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या आई-वडिलांना तिच्या या आजाराबाबत माहिती असूनही त्यांनी तिची काळजी न घेतल्याने हा अपघात झाल्याची टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *