मोठी बातमी! इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आता या देशावर हल्ला करणार, अमेरिकन खासदाराने सांगितलं नाव

Donald Trump : अमेरिका आणि इस्रायल सतत हल्ले करून इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी एका देशावर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आता या देशावर हल्ला करणार, अमेरिकन खासदाराने सांगितलं नाव
DJ Trump
Image Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2026 | 10:39 PM

संपूर्ण जग चिंतेत आहे, कारण अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या युद्धात मोठी जीवितहानी झाली आहे. इराणमधील अनेक सरकारी आणि खाजगी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिका आणि इस्रायल सतत हल्ले करून इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी एका देशावर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन खासदाराने याबाबत माहिती दिली आहे. हा देश कोणता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प आता या देशावर हल्ला करणार

अमेरिकन खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले की, ट्रम्प प्रशासन आता क्यूबाला लक्ष्य करू शकते. क्यूबाची कम्युनिस्ट हुकूमशाही लवकरच कोसळेल आणि त्यांचे शासन लवकरच संपुष्टात येईल. ग्रॅहम यांनी दावा केला की, क्यूबामध्ये आता हुकूमशाही सरकारचे आता मोजकेच दिवस उरले आहेत. ग्रॅहम यांनी ट्रम्प यांचा उल्लेख परराष्ट्र धोरणात आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष असा केला आहे. इराणचे दहशतवादी जाळे लवकरच संपुष्टात येईल असा दावाही त्यांनी केला आहे.

अमेरिका आणि क्यूबा यांच्यात वाद का आहे?

अमेरिका आणि क्यूबा यांच्यात गेल्या अनेक दशकांपासून तणाव आहे. 1959 मधील क्यूबा क्रांतीनंतर फिदेल कॅस्ट्रो यांनी सत्ता हाती घेतली आणि देशात कम्युनिस्ट सरकार स्थापन केले होते. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले. अमेरिकेने क्यूबावर आर्थिक निर्बंध लादले, जे आजही मोठ्या प्रमाणावर लागू आहेत. 1962 मधील क्यूबा क्षेपणास्त्र संकट हे दोन्ही देशांतील संबंधांमधील सर्वात धोकादायक वळण ठरले. त्या वेळी सोव्हिएत युनियनने क्यूबामध्ये अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तैनात केली होती, ज्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत संघ आमनेसामने आले होते. जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. मात्र नंतर हे संकट टळले, पण अमेरिका-क्यूबा संबंध पूर्णपणे सामान्य झाले नाहीत.

संबंध सुधारण्याचा प्रयत्नही झाला

2014 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्यूबासोबत संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला होता. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले होते. आर्थिक आणि प्रवास निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात आली होती. मात्र नंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबावर पुन्हा कडक निर्बंध लागू केले आणि त्यामुळे तणाव वाढला आहे.

Follow Us