AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने युद्धात उतरवले रशियन गेमचेंजर हत्यार,18 लाखांच्या वस्तूने 17 देशांत हडकंप

इराणचा प्रयत्न कमी खर्चाच्या स्फोटकांद्वारे अमेरिकेला छळण्याचा आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त नुकसान होत आहे. इराणच्या या स्ट्रॅटजीला अमेरिकेला फशी पडत आहे.

इराणने युद्धात उतरवले रशियन गेमचेंजर हत्यार,18 लाखांच्या वस्तूने 17 देशांत हडकंप
Iran Drone Power
| Updated on: Mar 02, 2026 | 10:10 PM
Share

इराणने युद्धात सौदीपासून कुवैतपर्यंत हंगामा केला आहे. इराणने आधी कुवैतच्या बेस वरुन उडणाऱ्या एफ-१५ जेट फायटरना टार्गेट केले. मात्र नंतर हे जेट फायटर कुवैतनेच चुकून उडवल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. त्यानंतर इराणने सौदीच्या इंधन कंपनीवर मोठा हल्ला केला. इराणने सौदीच्या तनुरा रिफायनरीला टार्गेट केले. येथूनच सौदीची सर्वात श्रीमंत इंधन कंपनी अरामकोचे संचलन होते. इराणने याशिवाय तुर्की, कतार सारख्या देशांवर हल्ले केले. विशेष म्हणजे इराणने हे हल्ले ड्रोनने केले आहेत. इराणने सोमवारी एकूण १७ देशांवर ड्रोनने हल्ले केले आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार इराणने युद्धाच्या पहिल्याच दिवशी १००० ड्रोनने हल्ले केले. सर्वाधित २०० ड्रोन हल्ले दुबईवर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी इराणने दुबईच्या धर्तीवर कुवैत आणि सौदीवर ड्रोन हल्ले केलेत ज्यामुळे कमी खर्चात इराणने जास्त नुकसान केले आहे.

इराणकडे आहे जगातले सर्वात खतरनाक ड्रोन

इराणकडे जगातले सर्वात खतरनाक हल्लेखोर ड्रोन आहे. ज्याचे नाव शाहेद-१३६ आहे.या ड्रोनने युक्रेनमध्येही हंगामा केलेला आहे. आता इराण याचा वापर मध्य पूर्वेत करत आहे. अमेरिकेच्या तळांवर इराण ड्रोन हल्ले करत आहे, इराणकडे एकून ८० हजार ड्रोन आहेत.

या ड्रोनद्वारे गुप्त माहिती जमा करण्याशिवाय त्याचा वापर हल्ल्यासाठी देखील करत आहे. इराणकडे हल्ला करणे आणि शस्रास्रे घेऊन जाणारे एकूण १२ पद्धतीचे ड्रोन आहेत. परंतू सर्वात धोकादायक शाहेद ड्रोन आहे. शाहेद – १३१ आणि शाहेद – १३६ द्वारे कोणावरही हल्ला करता येतो.

शाहेद – १३६ ड्रोनमध्ये अनेक तास हवेत राहण्यासाठी सक्षम आहे. हे ड्रोन २००० किमीपर्यंत जाऊन हल्ला करु शकते. याचा वेग २०० किमी प्रति तास इतका आहे. हल्ल्याच्या तयारी आधी ड्रोनमध्ये विस्फोटक भरले जाते. हे ड्रोन कोणत्याही वस्तू सोबत धडकले मोठा ब्लास्ट होतो.

या एका ड्रोनची किंमत १८ ते २० लाख रुपयांपर्यंत आहे. इराणने दरवर्षी २५ हजार ड्रोनची निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. या ड्रोनला इराणने रशियाच्या मदतीने तयार केले आहे. याच जानेवारीत १००० शाहेद-१३६ ड्रोन इराणने तयार केले आहेत.

इराणचा प्रयत्न कमी खर्चाच्या स्फोटकांद्वारे अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करण्याचा आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त नुकसान होत आहे.यंदा इराण स्ट्रॅटजीने अमेरिकेला फसवत आहे.कारण त्याचा प्रयत्न अमेरिकेला जास्त दिवस युद्धात गुंतवायचा असल्याचे अमेरिकन थिंकटँक डिफेन्स प्रीयरिटीचे मिडल इस्ट प्रोग्रॅमचे संचालक Rose Kelanic यांनी सांगितले.

  1. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एक पोस्ट केली होती, त्यात त्यांनी आम्ही अमेरिकेला हरवण्यासाठी २० वर्षांपासून काम करत आहोत. आम्हाला माहिती आहे की मध्य पूर्वेत अमेरिकेला कसे हरवायचे ते..इराणला माहिती आहे की अमेरिका जास्त दिवस युद्धात तग धरु शकणार नाही.
  2. इराणकडे मर्यादित क्षेपणास्रे आहेत. सध्या इराणकडे सुमारे २००० क्षेपणास्रे आहेत. रशिया तिकडे युक्रेन युद्धात अडकला आहे. त्यामुळे रशियाकडून मदत मिळणार नाही हे इराणला माहिती आहे. त्यामुळे इराण त्याच्या क्षेपणास्रांना जपून वापरत आहे. म्हणजे योग्य वेळी त्यांचा वापर करता येईल.
  3. ड्रोनचा खर्च कमी आहे. १८ लाखात एक ड्रोन तयार होते. जे अमेरिकेच्या ८१८ कोटी रुपयांच्या फायटर जेटला सहज पाडू शकते. इराण जगाला संदेश देऊ इच्छीते की त्यांचे कमी खर्चाचे शस्रे देखील खूप खतरनाक आहेत. इराणच्या या ड्रोनच्या प्रयोगाने अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे.
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...