AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्यासाठी अमेरिकेने किती रूपये खर्च केले? आकडा वाचून बसेल धक्का

US Iran War : इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले. खामेनी यांना मारण्यासाठी अमेरिकेने हजारो कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्यासाठी अमेरिकेने किती रूपये खर्च केले? आकडा वाचून बसेल धक्का
ali khameneiImage Credit source: Google
| Updated on: Mar 03, 2026 | 3:12 PM
Share

मध्य पूर्व आशियामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर सतत हल्ले करत आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. तीन दिवसांपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले. खामेनी यांना मारण्यासाठी अमेरिकेने हजारो कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. ईराणमधील गुप्त माहिती गोळा करण्यासाठी अमेरिकेने आपल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA)च्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवले होते. फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, CIA ने खामेनी यांना ट्रॅक करण्यासाठी ईराणच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील हॅक केले होते अशी माहितीही समोर आली आहे.

हजारो कोटींचा खर्च

गेल्या काही वर्षांपासून अली खामेनी हे इस्रायल आणि अमेरिकेच्या निशाण्यावर होते. ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर झालेल्या हिजाबुल्लाह आणि हमासच्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने CIA च्या अधिकाऱ्यांना ईराणमध्ये सक्रिय केले होते. Brown Edu च्या एका अहवालानुसार, 2023 ते 2025 या काळात अमेरिकेने ईराणमध्ये गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी सुमारे 2.5 अब्ज डॉलर (अंदाजे 2 लाख 28 हजार कोटी रुपये) खर्च केले आहेत.

ट्रम्प यांच्याकडून गुप्त अहवालाचे कौतुक

अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे कौतुक केले होते. ट्रम्प यांनी म्हटले होते की, खामेनी आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या ट्रॅकिंग सिस्टीमपासून बचावू शकले नाहीत. अमेरिकेने जगातील सर्वात मोठ्या शत्रूचा अंत केला आहे.’ ट्रम्प यांनी खामेनी यांची हत्या ही अमेरिकेसाठी मोठे यश असल्याचे म्हटले होते. खामेनी यांच्या हत्येनंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना त्यांचा मृतदेह दाखवण्यात आला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

अमेरिकेने खामेनी यांना मारण्यासाठी किती खर्च केला?

वॉटसन ब्राउन एज्युकेशनच्या लिंडा ब्राउन यांनी मध्यपूर्वेतील अमेरिकन ऑपरेशन्सवरील खर्चाबाबत एका अहवालातून माहिती दिली आहे. या अहवालानुसार ऑक्टोबर 2023 पासून अमेरिकेने मध्यपूर्वेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेने सर्वप्रथम इस्त्रायलला 21.7 अब्ज डॉलरचे लष्करी पॅकेज दिले. तसेच, मध्यपूर्वेतील देशांमध्ये ऑपरेशन्स चालवण्यासाठी 12.7 अब्ज डॉलरचा निधी राखून ठेवला. ही रक्कम ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खर्च करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान अमेरिकेने ईराण ऑपरेशनवर किती खर्च केला, याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...