इराणची IRGC आहे काय? इस्त्रायल अमेरिकाच नाही आखाती देशांमध्येही इतकी दहशत का? ट्रम्प यांच्या लेकीवरील हल्ल्यामागे सुद्धा या संघटनेचा हात?
Islamic Revolutionary Guard- IRGC: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाला सध्या विराम असला तरी धुसफूस सुरूच आहे. ट्रम्प यांच्यावर याअगोदर जीवघेणे हल्ले झाले. तर आता त्यांच्या कुटुंबियावरही हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे इराणची इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) असल्याचे म्हटले जात आहे.

What is Iran Islamic Revolutionary Guard- IRGC: अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचे ढग निवळलेले नाही. युद्धाला तात्पुरता ब्रेक लागला आहे. हे युद्ध केव्हाही भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच इराणने अमेरिकेसह इस्त्रायलविरोधात जोरदार मोर्चबांधणी केल्याने जगभर या देशाची चर्चा आहे. सर्वोच्च नेते युद्धात ठार झाल्यानंतरही इराण झुकला नाही, त्यामागे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) असल्याचे मानले जाते. IRGC, इराणच्या लष्कराचा भाग नाही. IRGC थेट इराणच्या सर्वोच्च नेत्याला त्यांच्या ऑपरेशन्सची आणि कारवायांची माहिती देतात.
इराणकडे दोन लष्कर
इराणकडे दोन मुख्य सशस्त्र दल आहे. एक ‘आर्टेश’ (Artesh), हे नियमित सैन्य आहे. तर दुसरे लष्कर ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) हे आहे. आयआरजीसीची स्थापना 1979 मधील इराण क्रांतीनंतर करण्यात आली. इराणच्या दोन्ही सैन्याचा गणवेश वेगवेगळा आहे. या दोन्ही लष्कराचे अधिकार वेगवेगळे आहे. या सैन्याचे लष्करी उद्दिष्ट वेगवेगळे आहे. आर्टेश आणि IRGC या दोघांचे काम स्वतंत्र आहे.
Artesh असताना IRGC ची स्थापना का?
शाह मोहम्मद रजा पहलवी ही राजेशाही इराणमध्ये उलथवून टाकण्यात आली. त्यावेळी इस्लामिक क्रांतीनंतर लष्करावर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा विश्वास नव्हता. कारण नियमित लष्कराची निष्ठा ही अगोदरच्या राजेशाहीसोबत होती. त्यामुळे नवीन लष्करी संघटना तयार करण्यात आली. त्याला इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स असे नाव देण्यात आले. इस्लामिक क्रांतीनंतर ही लष्करी संघटना अस्तित्वात आली. सुरुवातीला हे छोटे सुरक्षा दल होते. 1980 मध्ये जेव्हा इराण-इराक युद्ध सुरू झाले. तेव्हा ही संघटना अधिक मजबूत करण्यात आली. IRGC मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली. ही संघटना इस्लामिक गणराज्याचा एक मजबूत खांब आहे. तर आता जगभरात या संघटनेला फंडिंग करणारे आहेत. संघटनेचे गुप्तहेरांचा मोठे जाळे आहेत. त्यामुळेच ट्रम्प कुटुंबियांवर ही संघटनाच हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
IRGC चे काय आहे मिशन?
IRGC कडे इस्लामिक शासन व्यवस्थेची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे.
IRGC ही इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल कार्यक्रमाचे देखरेख करते.
ही लष्करी संघटना ‘कुद्स फ़ोर्सवर’ (Quds Force) नियंत्रण ठेवते. ती इराणच्या सीमेवर सुरक्षेचे काम करते.
IRGC देशातंर्गत सुरक्षा सुद्धा करते. तिच्यात अनेक सक्रिय स्वयंसेवक आहेत. ते अर्धसैन्यदलासारखे काम करतात.
IRGC त्यांच्या सर्व कारवायांची माहिती थेट इराणच्या सर्वोच्च नेत्याला देतात.