What is Iron Beam: इस्रायलने बनवलं ‘स्टार वॉर्स’ सारखं घातक अस्त्र, जगातलं पहिल एनर्जी वेपन, काय आहे ‘आर्यन बीम’, पहा VIDEO

What is Iron Beam: नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगळ्या डिझाईन्स आणि नवीन शोधांमागे अनेकदा चित्रपट प्रेरणास्त्रोत असतात. इस्रायली इंजिनिअर्स आणि वैज्ञानिकांनी स्टार वॉर्स सारखी लेझर बीम टेक्नोलॉजी (laser beam Technology) विकसित केली आहे.

What is Iron Beam: इस्रायलने बनवलं स्टार वॉर्स सारखं घातक अस्त्र, जगातलं पहिल एनर्जी वेपन, काय आहे आर्यन बीम, पहा VIDEO
आर्यन बीम एअर डिफेन्स सिस्टिम इस्रायल
Image Credit source: (Photo: Screengrab/Naftali Bennett)
| Updated on: Apr 18, 2022 | 3:05 PM

जेरुसलेम: नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगळ्या डिझाईन्स आणि नवीन शोधांमागे अनेकदा चित्रपट प्रेरणास्त्रोत असतात. इस्रायली इंजिनिअर्स आणि वैज्ञानिकांनी स्टार वॉर्स सारखी लेझर बीम टेक्नोलॉजी (laser beam Technology) विकसित केली आहे. या टेक्नोलॉजी द्वारे शत्रूने डागलेल्या मिसाइल्सला (Missiles) टार्गेट करता येते. ‘तुम्हाला हे ऐकून सायन्स फिक्शन म्हणजे काल्पनिक वाटेल. पण हे सत्य आहे’ असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले. आर्यन बीम (Iron Beam) ही लेझर मिसाइल डिफेन्स सिस्टिम आहे. ही टेक्नोलॉजी शत्रूचे ड्रोन्स, मोर्टास, रॉकेट आणि रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र इंटरसेप्ट म्हणजे शोधून नष्ट करते. शस्त्रास्त्र विकसित करण्यात इस्रायल नेहमीच आघाडीवर राहिला आहे. शस्त्रास्त्रांचा तो एक मोठा निर्यातदार देशही आहे. आर्यन बीम ही इस्रायलाच्या हवाई सुरक्षा सिस्टिमचा एक भाग आहे. इस्रायलकडे आर्यन डोम ही टेक्नोलॉजी आधीपासूनच उपलब्ध आहे. आर्यन डोम हे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण देणारं कवच आहे. आर्यन बीम ही जगातील पहिली ऊर्जाआधारीत वेपन सिस्टिम असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

जगातलं पहिलं एनर्जी वेपन

वैमानिकरहित विमान, रॉकेट आणि मोर्टास पाडण्यासाठी लेझर बीमचा वापर करता येतो. “आर्यन बीम लेझर इंटरसेप्शन सिस्टिमची इस्र्यालने यशस्वी चाचणी केली आहे. जगातील ही पहिली ऊर्जाआधारीत वेपन सिस्टिम आहे. यूएव्ही, रॉकेट आणि मोर्टार पाडण्यासाठी लेझर किरणांचा वापर केला जातो” असं इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट म्हणाले.

लेझर किरणांद्वारे हवेतच हल्ला

इस्रायलच्या सरकारने एक व्हिडिओ रिलीज केला आहे. यात आर्यन बीम सिस्टिम वैमानिक रहित यूएव्हीना टार्गेट करताना दिसते. यूएव्हीने हल्ला करण्याआधी लेझर किरणांद्वारे हवेतच त्यांना नष्ट करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतय. मागच्या महिन्यात इस्रायलच्या वाळवंटात ही चाचणी करण्यात आली.

पॅलेस्टाइन इराणला इशारा

हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. यात म्युझिक सुद्धा आहे. ग्राऊंड स्टेशनवरच्या आर्यन बीममधून सोडण्यात आलेली लेझर किरण वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणाऱ्या मिसाइलला हवेतच नष्ट करतात. या मिसाइलचे हवेतच छोटे-छोटे तुकडे विखुरल्याचे दिसतात. या नव्या लेझर सिस्टिमबद्दल इस्रायलने खूपच कमी माहिती दिली आहे. पण जमीन, हवा आणि समुद्रा मध्ये लवकरच ही आर्यन बीम प्रणाली तैनात केली जाईल. इस्र्यालच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या नव्या सिस्टिमची घोषणा करुन इस्रायलने एकप्रकारे पॅलेस्टाइन आणि इराणला इशारा दिला आहे.