AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या देशाकडे किती आहेत विमानवाहू नौका, समुद्रात कोणाची ताकद किती ?

जगात विमानवाहू नौकाची ( Aircraft Carrier ) ताकद काही मोजक्या देशांकडेच आहे. अमेरिका, चीन, भारतासह मोठ्या देशांकडे नेमक्या किती विमानवाहू नौका आहेत, कोण आहेत सर्वात पुढे पाहूयात...

कोणत्या देशाकडे किती आहेत विमानवाहू नौका, समुद्रात कोणाची ताकद किती ?
ins vikramaditya
| Updated on: Sep 08, 2026 | 5:55 PM
Share

समुद्रात कोणत्या देशाची सैन्य ताकद किती आहे हे दाखवणाऱ्या सर्वात मोठ्या हत्यारांपैकी विमानवाहू नौकाचा ( Aircraft Carrier) समावेश आहे. विमानवाहू नौका समुद्रात तरंगत्या एअरबेस प्रमाणे काम करत असते. या विमानवाहू युद्धनौकावरुन लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर उडवता येते. सध्या विमानवाहू युद्धनौकाच्या बाबतीत अमेरिका इतर देशांहून खूपच पुढे आहे. चीन वेगाने आता विमानवाहू नौका ( Carrier Fleet ) वाढवत आहे. भारतही हिंद महासागरात आपली उपस्थिती दाखवत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये अमेरिकन Aircraft Carrier USS Abraham Lincoln दीर्घ तैनाती देखील चर्चेत आहे. ही विमानवाहू नौका अलिकडेच थायलंडहून पटायाला पोहचली होती. आणि याच्या आधी अनेक दिवस समुद्रात तैनात होती.

अमेरिकेकडे सर्वाधिक 11 Aircraft Carrier

Aircraft Carrier च्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. अमेरिकी नौदलाजवळ 11 मोठ्या अणू ऊर्जेवरुन धावणाऱ्या Aircraft Carrier आहेत. यात नव्या Nimitz Class आणि नवीन Gerald R. Ford Class च्या Carrier नौकाचा समावेश आहे. या विमानवाहूनौकांवरुन मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमाने ऑपरेट करता येऊ शकतात. दीर्घकाळ समुद्रात राहून दुसऱ्या देशांच्या विरोधात मोहिम सुरु करण्याचा क्षमता त्यांच्याकडे आहे. या कारणामुळे कॅरिअरच्या संख्ये सोबतच त्यांचे तंत्रज्ञान, विमान, आणि जगातील विविध देशातील त्यांची तैनाती अमेरिकेला या क्षेत्रात जगापेक्षा सर्वात मजबूत बनवते.

चीनकडे 3 Aircraft Carrier, Fujian

चीनकडे तीन एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. चीनकडे 3 Aircraft Carrier असून त्यात Liaoning, Shandong आणि Fujian यांचा समावेश आहे. यात Fujian सर्वात नवीन असून तिला नोव्हेंबर 2025 मध्ये समाविष्ठ करण्यात आले.

Fujian मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक विमान लॉन्च सिस्टीम लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे तिची विमान लाँच करण्याची क्षमता जुन्या चीनी विमानवाहू नौकाहून अधिक आहे.2026 मध्ये चीनच्या हिच्या ऑपरेशनल वापराच्या दिशेने पावले उचलली. त्यामुळे चीन समुद्रात आपली ताकद वाढवण्याचा वेगाने प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.

भारताकडे 2 Aircraft Carrier

सध्या भारताकडे INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत अशा दोन विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रांत भारतात तयार झालेली पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आहे. दोन्ही युद्धनौका भारतीय नौदलासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत. आणि यातून हिंद महासागर क्षेत्रात भारताची समुद्री ताकद वाढली आहे. INS विक्रमादित्य रशियाने दिलेली युद्धनौका असून दोन्ही विमानवाहू युद्धनौका भारतासाठी महत्वाच्या आहेत. चीनची वाढलेली ताकद पाहून भारतही तिसरी विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची शक्यता आहे.

ब्रिटन, इटली आणि जापान देखील मजबूत

Aircraft Carrier च्या संख्येत अमेरिका, चीन आणि भारत यांच्या नंतर दुसरेही काही देश आहेत. ब्रिटनजवळ २ क्वीन एलिझाबेथ क्लास एअरक्राफ्ट कॅरीयर आहे. इटलीच्या जवळ देखील दोन मोठ्या कॅरीयर आहेत. तर जपानच्या जवळ देखील अशा Aircraft Carrier विमानवाहू युद्ध नौका आहेत. ज्यांच्यावरुन F-35B शॉर्ट टेकऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग वाले विमान ऑपरेट केले जाऊ शकतात. फ्रान्सजवळ देखील एक अणू ऊर्जेवरील चालणारी विमानवाहू युद्धनौका आहे. मात्र सर्व देशांच्या कॅरियरचा आकार, विमान क्षमता आणि वापराचा प्रकार वेगवेगळा आहे. त्यामुळे केवळ संख्या पाहून त्यांच्या ताकदीची तुलना होऊ शकत नाही.

समुद्रात सर्वात शक्तिशाली कोण आहे?

विमानवाहू जहाजांची संख्या, त्यांचा आकार, अणुशक्ती, लढाऊ विमानांची क्षमता आणि जागतिक तैनाती या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास, अमेरिका ही सर्वात शक्तिशाली विमानवाहू नौकांची शक्ती आहे. चीन वेगाने प्रगती करत असून, ‘फुजियान’ विमानवाहू नौका हे तिच्या वाढत्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. भारताची ताकद प्रामुख्याने हिंद महासागर क्षेत्रात असून, त्यांच्याकडे दोन कार्यरत विमानवाहू जहाजे आहेत.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…