मोठी बातमी! अमेरिका आता या देशावर करणार थेट हल्ला, ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा, जगाची झोप उडाली

मोठी बातमी समोर येत आहे, इराणसोबत युद्ध सुरू असतानाच आता अमेरिकेकडून आणखी एका देशावर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे जगाची झोप उडाली आहे. आणखी एका युद्धाची शक्यता आहे.

मोठी बातमी! अमेरिका आता या देशावर करणार थेट हल्ला, ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा, जगाची झोप उडाली
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 5:08 PM

अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेकडून या युद्धावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. मात्र तरी देखील इराण काही मागे हटण्यास तयार नाहीये. हे युद्ध आपण काही आठवड्यात समाप्त करू अशी अपेक्षा अमेरिकेची होती, मात्र अमेरिकेनं जो विचार केला त्याच्या उलट सध्या घडताना दिसत आहे. या युद्धात अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळं आहेत, त्या -त्या देशांवर इराणकडून हल्ले सुरूच असल्यानं आता अमेरिकेवरील दबाव वाढला आहे. अमेरिकेकडून एकदा -दोनदा युद्धविरामाचा देखील प्रयत्न झाला. मात्र जोपर्यंत युद्धात आमचं जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई मिळत नाही, तोपर्यंत युद्ध बंद करणार नसल्याचं इराणने म्हटलं आहे. दरम्यान एकीकडे इराणसोबत युद्ध सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगाची झोप उडाली आहे.

इराणसोबत युद्ध संपलेलं नसतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प हे आणखी एका देशावर हल्ला करणार आहेत. हा देश अमेरिकेचं राज्य फ्लोरिडापासून अवघ्या 170 किलोमीटर अंतरावर असून, या देशाची लोकसंख्या एक कोटी दहा लाखांच्या आसपास आहे. या देशाचं नाव क्यूबा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता क्यूबा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. क्यूबाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गेल्या 67 वर्षांपासून क्यूबाची भूमी बळकवण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यामध्ये अमेरिकेच्या 13 राष्ट्राध्यक्षांना यश आलं नाही, त्यानंतर आता ट्रम्प देखील त्याच वाटेनं पुढे जात असून, त्यांनी पुढचा हल्ला क्यूबावर होणार असल्याचं म्हटलं आहे.

सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धाचा या देशावर एवढा भीषण परिणाम झाला आहे की, या देशाला होणाऱ्या सर्व प्रकराच्या इंधनाचा पुरवठा ठप्प झाला आहे. क्यूबा पूर्णपणे अंधारात बडून गेला आहे. वीज, गॅस तसेच इतर कोणतंही इंधन सध्या या देशाकडे नाहीये. मात्र जरी असं असलं तरी देखील क्यूबा हा चीनी कॉफी, नॅचरल रिसोर्सोज आणि मिनरल्ससाठी जग प्रसिद्ध आहे.

Follow Us