AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Us, Iran, Israel war : थेट युद्धभूमीतून इराणचा मित्र भारतासाठी खास संदेश; संपूर्ण जग पाहात राहिलं, भारताची सर्वात मोठी चिंता दूर

मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढलेली असतानाच आता थेट युद्धभूमीतून इराणने भारतासाठी खास संदेश पाठवला आहे. इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे भारताची मोठी चिंता मिटली आहे.

Us, Iran, Israel war : थेट युद्धभूमीतून इराणचा मित्र भारतासाठी खास संदेश; संपूर्ण जग पाहात राहिलं, भारताची सर्वात मोठी चिंता दूर
pezeshkianImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 4:09 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर असा आरोप करण्यात आला आहे की, इराणकडून आण्विक अस्त्रांची निर्मिती सुरू आहे, तर इराणने अमेरिका आणि इस्त्रायलचे हे आरोप फेटाळून लावले आहे. आम्ही फक्त युरेनियमचा वापर हा ऊर्जा निर्मितीसाठी करत आहोत, असं इराणने म्हटलं आहे. दरम्यान यावरूनच 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर पहिला हल्ला केला आणि या युद्धाला सुरुवात झाली. आज या युद्धाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. मात्र युद्ध सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे.

इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रीट ऑफ होमूर्ज बंद केला आहे, त्यामुळे जगभरात सध्या भीषण इंधन टंचाई जाणवत आहे. इराणने पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होमूर्ज वाहतुकीसाठी खुला करावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेकडून त्यासाठी साम, दाम दंड भेद नीतीचा अवलंब होत आहे. जर होमूर्ज स्ट्रीट ओपन नाही झाला तर आम्ही इराणला अश्म युगात पोहचवू अशी थेट धमकी देखील अमेरिकेकडून इराणला देण्यात आली आहे. मात्र अमेरिकेच्या या धमकीचा इराणवर कोणताही परिणाम झाल्याचं पहायला मिळत नाही.

दरम्यान भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी म्हणजे अनेक भारतीय लोक इराणमध्ये अडकून पडले आहेत.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 8 भारतीय लोकांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. भारताप्रमाणेच इतरही काही देशांचे लोक इराणमध्ये अडकले आहेत. मात्र हे युद्ध सुरू असताना आता युद्ध भूमीतून इराणने आपला मित्र भारतासाठी एक खास संदेश जारी केला आहे. आमचे इराणमधील भारतीय मित्र हे सुरक्षित हातात आहेत, काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं इराणने आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान इराणच्या या भूमिकेमुळे काहीअंशी तरी भारताची चिंता कमी झाली आहे.  दुसरीकडे रशियाचे देखील काही नागरिक सध्या इराणमध्ये अडकले आहेत, या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सध्या रशियाकडून सुरू आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?