AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुतिन यांच्या एका इशाऱ्याने थांबणार अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्ध; कोणत्याही क्षणी होऊ शकते युद्धविरामाची घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, ज्याची संपूर्ण जग वाट पहात आहे तो क्षण आता जवळ आला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये काही काळासाठी युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यासाठी रशियाने पुढाकार घेतला आहे.

मोठी बातमी! पुतिन यांच्या एका इशाऱ्याने थांबणार अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्ध; कोणत्याही क्षणी होऊ शकते युद्धविरामाची घोषणा
Putin, TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 2:53 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. इराणकडून केवळ अमेरिका आणि इस्त्रायललाच लक्ष्य केलं जात नाहीये, तर ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळं आहेत, त्या सर्व आखाती देशांवर देखील इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात प्रचंड मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा काही प्रमाणात फटका हा भारताला देखील बसला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमधून येणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. हे युद्ध जर अधिक काळ सुरू राहिलं तर जगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हे युद्ध लवकर संपवावं, युद्धविराम व्हावा अशीच संपूर्ण जगाची इच्छा आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता एक गुडन्यूज समोर येत आहे, ती म्हणजे आता लवकरच इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र जरी युद्धविरामाची घोषणा झाली तरी देखील हा युद्धविराम कायमस्वरूपी नसून काही दिवसांसाठी युद्धविराम होणार आहे. त्यासाठी रशियाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या पुढाकारातून हा युद्धविराम घडून येणार आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार रशिया हे युद्ध थांबवाव यासाठी हा युद्धविराम घडवून आणत नाहीये तर इराणमध्ये रशियाचे अनेक नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हा युद्धविराम होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

इराणच्या बुशहर न्यूक्लियर पावर प्लांटमध्ये रशियाचे जवळपास 400 ते 700 कर्मचारी काम करत आहेत. त्यातील काही जणांची यापूर्वीच रशियाने सुटका केली आहे. मात्र जे रशियाचे नागरिक या युद्धात इराणमध्ये अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी रशिया आता अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम घडवून आणणार आहे. यासाठी रशिया लवकरच इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत बोलणार आहे. तसेच इराण हे रशियाचे मित्र राष्ट्र असल्यामुळे ते देखील युद्धविरामासाठी तयार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. युद्धविराम करून आपले नागरिक सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्लॅन रशियाकडून बनवण्यात आला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा