हाती AK-47, रॉकेट लाँचर, पण गाल नेहमी फुगलेले,सौदीला छळणाऱ्या हुती बंडखोरांच्या सिक्रेट काय ?

सौदी अरबने अमेरिकेच्या धोरणाला कंटाळून इराणपासून संरक्षणासाठी पाकिस्तानशी संरक्षण करार केला असूनही हुती बंडखोरांनी सौदीवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानाला सौदीच्या बचावासाठी कोणतेही पाऊल उचलता आलेले नाही.

हाती AK-47, रॉकेट लाँचर, पण गाल नेहमी फुगलेले,सौदीला छळणाऱ्या हुती बंडखोरांच्या सिक्रेट काय ?
Houthi rebels
| Updated on: Sep 13, 2026 | 10:05 PM

Yemen Houthi Rebel News : येमेनच्या हुती बंडखोरांनी सौदी अरबच्या अडचणीत वाढ केली आहे. लाल समुद्राच्या काही भागात त्यांनी वर्चस्व मजबूत केल्यानंतर सौदीच्या सैन्य अड्ड्यांवर हल्ले सुरु केल्याचे म्हटले जात आहे. मोखा पोर्ट आणि त्यानंतर पेरिम बेटावर त्यांनी कब्जा केल्याने सौदीला टेन्शन आले आहे. दक्षिण सौदी अरबच्या शरुरा सैन्य अड्ड्यांवर हुतींनी बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा दावा केला आहे.

एकीकडे हुती बंडखोरांनी लाल सागरात कब्जा केला आहे. तर दुसरीकडे सौदीच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. या दरम्यान हुतींच काही फोटो व्हायरल झाले आहेत.त्यात हुती बंडखोरांच्या हातात AK-47, रॉकेट लॉन्चर आणि एक गाल फुगलेला दिसत आहे. या हुती बंडखोरांच्या एका गालात नेमके काय असा सवाल केला जात आहे.

सौदी अरबने एकीकडे आणि पाकिस्तान यांच्यात 17 सप्टेंबर 2025 रोजी एक सामरिक परस्पर सुरक्षा करार केला आहे, ज्यामध्ये ऑगस्ट 2026 मध्ये तुर्कियेचाही देखील समावेश करण्यात येऊन’मक्का संयुक्त संरक्षण करार’ झाला आहे. मात्र, इराण समर्थक हुतींनी सौदीवर हल्ले करुन पाकिस्तान सौदीची मदत करु शकलेला नाही.

फुगलेल्या गालाचे रहस्य काय ?

आता हुती बंडखोरांच्या एक गाल फुगलेल्या फोटोंची चर्चा सुरु आहे. यात हुती बंडखोरांच्या गालात एक पदार्थ असतो. त्याला खत वा क्युएट म्हटले जाते. ही Catha Edulis झाडांची ताजी पाने असतात. ज्याला येमेनमध्ये मोठ्या संख्येने लोक चावत असतात. त्यामुळे बाहेरुन त्यांच्या गाल फुगलेला दिसतो. या पानात कॅथिनोन नावाचा पदार्थ असतो. ज्याचा उत्तेजक म्हणून वापर केला जातो. या पानाचे सेवन केल्याने ताजे उत्साही वाटते, एकाग्रता वाढते असे म्हटले जाते. तसेच थकवा कमी जाणवतो आणि भूक मरुन जाते. येमेनमध्ये खत या पदार्थाला केवळ नशा म्हणून पाहिले जात नाही तर येथे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा तो एक भाग आहे. लोक दुपारनंतर एकत्र बसून खत चघळत बसतात आणि गप्पा मारत वेळ घालवतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us