AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World War 3: तिसरं महायुद्ध सुरू होणार? ट्रम्प यांनी ‘या’ देशाला दिली अणुहल्ल्याची धमकी, संपूर्ण जगाची झोप उडाली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनजवळील क्वांटिको मिलिटरी बेसवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीला शेकडो जनरल, अ‍ॅडमिरल आणि त्यांचे सल्लागार उपस्थित होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी रशियाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.

World War 3: तिसरं महायुद्ध सुरू होणार? ट्रम्प यांनी 'या' देशाला दिली अणुहल्ल्याची धमकी, संपूर्ण जगाची झोप उडाली
donald-trump and russia
| Updated on: Sep 30, 2025 | 10:46 PM
Share

अमेरिका आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनजवळील क्वांटिको मिलिटरी बेसवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीला शेकडो जनरल, अ‍ॅडमिरल आणि त्यांचे सल्लागार उपस्थित होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी रशियाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. “गरज पडल्यास आमच्याकडे सर्वात आणि सर्वोत्तम अण्वस्त्रे आहेत. मात्र आम्ही त्यांचा वापर करु इच्छित नाहीत.” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘जेव्हा रशियाने अण्वस्त्रांबद्दल विधान केले होते, त्यावेळी अमेरिकेने आपली सर्वात धोकादायक अण्वस्त्र पाणबुडी रशियाजवळ पाठवून त्यांना उत्तर दिले होते. कारण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. आमच्या पाणबुड्या रशिया आणि चीनपेक्षा 20 वर्षे पुढे आहेत. तसेच पुढे बोलताना ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा “कागदी वाघ” असा उल्लेख केला.

पुतिन यांच्याशी झाली होती भेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. यातून अमेरिका ही युद्धासाठी तयार असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या दोघांमध्ये अलास्कामध्ये भेट झाली होती, यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, ‘तुम्ही चार वर्षांपासून असे युद्ध लढत आहात, मात्र हे युद्ध एका आठवड्यात संपू शकले असते.’ यानंतर आता ट्रम्प यांनी म्हटले की, पुतिन यांच्याबद्दल मी खूप निराश आहे. मला वाटले होते की ते हे युद्ध लवकर संपवतील. मात्र तसे झाले नाही.

शस्त्रांची विक्री लवकरच वेगाने होईल.”

ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका लवकरच शस्त्र विक्री पुन्हा सुरू करणार आहे. लवकरच याची घोषणा होईल. कारण अनेक देश अमेरिकन शस्त्रे खरेदी करू इच्छित आहेत, मात्र उत्पादनाला विलंब होत आहे, अनेक देशांच्या ऑर्डर रखडल्या आहेत. काही देश बरीच शस्त्रे खरेदी करत आहेत. यातील बरेच देश हे आमच्यासोबत आहेत.’ दरम्यान ट्रम्प यांच्या विधानावरून आगामी काळात अमेरिका मोठे पाऊल उचलण्याची शक्यता दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...