हवेत उडणारं हेलिकॉप्टर एका सेकंदात क्रॅश, अब्जाधिशाचा पत्नीसह मृत्यू, काय चूक झाली?
झिम्बाब्वेमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातामध्ये देशाचा सर्वात प्रसिद्ध व्यवसायिकाचा आणि त्याच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर व्यवसायिकाची जीवनशैलीही चर्चेत आली आहे.

झिम्बाब्वेमधल्या मरोनडेरा या परिसरामध्ये बुधवारी रात्री एक भीषण घटना घडली आहे. एक हेलिकॉप्टर कोसळून यामधील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा भलेमोठे आगीचे डोंब उसळले होते. त्यामुळे प्रवाशांना काही हालचालच करता आली नाही आणि जीवानिशी जावं लागलं. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमध्ये झिम्बाब्वेचे प्रसिद्ध व्यवसायिक विकनेस चिवायो आणि त्यांची पत्नाीी लूसी मुतेके यांचाही मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ते दोघे नवरा बायको प्रवास करत होते. पण आता अख्ख्या चिवायो कुटुंबाला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या घटनेनंतर आता सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, चिवायो हे झिम्बाब्वेचे राष्ट्रपती एमर्सन मनांग्वागा यांचे निकटवर्तीय मानले जायचे.
या घटनेमध्ये मृत पावलेल्या इतर नागरिकांबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे सध्यतरी पोलिस आणि संबंधित अधिकारी या घटनेची सखोल चौकशी आणि तपास करत आहेत. विकनेल चिवायो हे झिम्बाब्वेमधील प्रसिद्ध व्यावसायिक होते. ते इंट्राटेक झिम्बाब्वेचे संस्थापक होते. ही कंपनी उर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्टचरसंबंधी प्रोजेक्टवर काम करते. दरम्यान, चिवायो यांचे अनेक बड्या नेत्यांशीही संबंध असल्यामुळे ते प्रचंड चर्चेत होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो, टांझानियाचे अध्यक्ष सामिया सुलूहू हसन आणि एस्वातिनीचे राजे मस्वाती तिसरे यांची भेट घेतली होती.
दरम्यान, चिवायोच्या कंपनीला झिम्बाब्वेमध्ये अनेक सरकारी प्रोजेक्ट मिळाले. ज्यामध्ये शंभर मेगावॅटच्या ग्वांडा सोलर प्रकल्पाचाही समावेश आहे. हा प्रकल्प पूर्वीच्या करारांमध्ये अडकलेला होता. त्यानंतर कंपनी आणि सरकार यांच्यामधलं हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचले होते. दरम्यान, चिवायो यांच्या व्यवसायाबद्दल आणि सरकारी कंत्राटाबद्दल वेळोवेळी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
दरम्यान चिवयोने सोशल मीडियावर त्याच्या आलिशान जीवनशैलीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने महागड्या गाड्या, खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टरमधील स्वतःचे फोटो पोस्ट केलेले दिसत आहेत. त्याने त्याची पत्नी लुसीसोबतच्या प्रवासाचे फोटोही शेअर केले आहेत. सेलिब्रिटी, धार्मिक नेते आणि इतरांना महागड्या गाड्या आणि रोख रक्कम भेट दिल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला होता. दरम्यान, आता त्याच्या पत्नीसोबत जग सोडले आहे, एवढच सत्य आहे.