AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Legal Knowledge : तुझ्या पिरियड्सची तारीख काय गं, महिलेला प्रश्न विचारणे कायद्याने गुन्हा आहे का? वाचा सविस्तर

महिलांना मासिक पाळीविषयी विचारणे, मासिक पाळीची तारीख विचारणे कायद्याने गुन्हा आहे का? याबाबत अनेकांना कल्पना नाही. कायद्यात याविषयी काही तरतूद आहे का? याचीही अनेकांना स्पष्ट माहिती नाही.

Legal Knowledge : तुझ्या पिरियड्सची तारीख काय गं, महिलेला प्रश्न विचारणे कायद्याने गुन्हा आहे का? वाचा सविस्तर
menstrual cycle and periods
| Updated on: Nov 09, 2025 | 5:54 PM
Share

आपल्या समाजात आजही महिलांच्या लैंगिकतेबद्दल फारसं उघडपणे बोललं जात नाही. सोबतच महिलांच्या लैंगिक आवयवांशी निगडित असलेले आजार, त्रास यावर तर अनेक घरांत अजूनही चर्चा होत नाही. पिरियड्स म्हणजेच मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज बऱ्याच ठिकाणी अजूनही तसेच आहेत. पिरियड्सविषयी तर कधीही उघडपणे बोलले जात नाही. अनेक संस्था, सरकार याविषयी जनजागृती करत असतात. परंतु पिरियड्सविषयीच्या गैरसमजाचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे. त्यामुळेच एखाद्या महिलेला तिच्या पिरियड्सबद्दल विचारणे, तिच्या पिरियड्सची तारीख विचारणे हा कायद्याने गुन्हा आहे का? कायद्यात याबाबत काही तरतूद आहे का? हे जाणून घेऊ या…

महिलेला पिरियड्सची तारीख विचारणे गुन्हा आहे का?

खरं म्हणजे महिलेला तिच्या पिरियड्सबद्दल विचारल्यानंतर त्याला थेट गुन्हा ठरवणारा कोणताही ठोस कायदा भारतात नाही. डॉक्टर, नर्स यासारखी एखादी व्यक्ती महिलेच्या काळजीपोटी, आरोग्याचा मुद्दा समोर ठेवून हा प्रश्न विचारत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरत नाही. परंतु हाच प्रश्न संबंधित महिलेची खिल्ली उडवण्याचा दृष्टीकोन समोर ठेवून केलेला असेल तर तो गुन्हा ठरू शकतो. महिलेची खिल्ली उडवणे, तिला अपमानास्पद वाटेल, तिची मस्करी करणे असा उद्देश समोर ठेवून महिलेला तिच्या परियड्सची तारीख विचारल्यास तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. पिरियड्सविषयी केलेल्या एखाद्या प्रश्नातून महिलेची प्रतिष्ठा, तिचा खासगीपणाचा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो

गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा काय?

एखाद्या महिलेला तिच्या पिरियड्सच्या तारखेबद्दल विचारणं हा गुन्हा गुन्हा नाही. परंतु त्या विचाण्यात नेमका उद्देश काय होता? यावरून ते कृत्य गुन्हा ठरू शकतं. मात्र काही विशेष बाबींमध्ये हे कृत्य कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतं. उदाहरणात ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती महिलेला पुन्हा पुन्हा पिरियड्सबद्दल बोलून तिच्या खासगी बाबींवर टिप्पणी करत असेल तर तो गुन्हा ठरतो. अशा प्रकारचा गुन्हा हा लैंगिक छळ मानला जातो. त्यामुळे Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. एखाद्या महिलेला लज्जास्पद वाटावे हा उद्देश समोर ठेवून गर्दीच्या ठिकाणी, सोशल मीडियावर पिरियड्सबद्दल विचारल्यास तो गुन्हा ठरू शकतो. हे कृत्य गोपीनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन ठरू शकते. अशा प्रकरणात एका वर्षापर्यंत शिक्षा, आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?