Black Rice: भारतात कुठे पिकतो काळा तांदुळ ? सौदी ते मलेशियापर्यंत मागणी
Black Rice: भारतात पिकणाऱ्या काळ्या तांदुळाला 80 हून अधिक देशात मागणी आहे. कोणत्या राज्यात या काळ्या तांदुळाचे उत्पादन होते पाहूयात...

देशात तांदळाची अनेक जाती उगवल्या जातात.परंतू जेव्हा काळ्या तांदुळाचा विषय आला तर चक-हाओचा उल्लेख होतो. हा काळा तांदुळ मणिपूरात पिकवला जातो. स्थानिक स्तरावर ब्लॅक एरोमॅटिक राईस देखील म्हटले जाते. पूर्वोत्तरातील मणिपूर हे काळ्या तांदुळाचा किल्ला म्हटला जातो. चक-हाओ तांदुळाची ओळख एका जिल्ह्याने नव्हे तर मणिपूराशी संबंधित आहे.याचे GI रेकॉर्ड देखील राज्यस्तरावर नोंदला गेला जाते.
भौगोलिक क्षेत्रात मणिपूर सह नागालँड येथे देखील काळ्या तांदुळाची पैदास होते. मात्र,मणिपूर याला याचा गड मानले जाते. आता प्रश्न हा आहे की या तांदुळाला काळा रंग कसा काय येतो आणि पूर्वेत्तर राज्यात हा तांदूळ जास्त का पिकतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय ?
चक-हाओचा याचा काळा रंग याच्या नैसर्गिक पिगमेंट एंथोसायनिनमुळे होतो. एंथोसायनिन हे पिंगमेंट आहे जे अनेक प्रकारच्या रोपात आढळते. आणि याला लाल, बैंगणी आणि निळा रंग देते. हे पिगमेंट तांदुळाचा रंग डार्क करते.
सणसुदीचा खास तांदुळ
मणिपुरात चक-हाओचा वापर खास सणासुदीत केले जातो. रोजच्या जेवणाऐवजी हा तांदुळ खास सणासुदीच्या थाळीचा भाग असतो. याचा सुवास आणि रंग अन्य तांदुळापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे सर्वसाधारण तांदुळापेक्षा हा भिन्न आहे.
चक-हाओला जीआय टॅग प्रदान केलेला आहे. जीआय टॅगचा अर्थ असा आहे की, त्याचे उत्पादन करणाऱ्या प्रदेशाला स्वतःच्या नावावर आणि या तांदुळाच्या ओळखीवर हक्क आहे. यामुळे बनावट किंवा आयात केलेला तांदूळ चक-हाओ म्हणून विकणे कठीण होते आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला मान्यता मिळते.
किती देश ते खरेदी करतात?
जगभरातील ८० हून अधिक देश भारतातून काळा तांदूळाची आयात करतात. अमेरिका हा सर्वात मोठा खरेदीदार आहे. याशिवाय, युके, युरोप, मध्य पूर्व, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया, उत्तर अमेरिका आणि अनेक आफ्रिकन देशांनाही हा काळा तांदुळ विकला जातो.
मणिपूरमध्ये काळा तांदूळ का पिकतो?
काळा तांदूळ हे मणिपूरचे पारंपरिक पिक असून, मैतेई समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रथांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, हा तांदुळ राजदरबारातील मेजवान्या आणि धार्मिक समारंभांमध्ये वाढला जात असे. सुगंध आणि चिकटपणा यांचा मिलाफ हे त्याचे वैशिष्ट्य आहे, जे जगभरातील काळ्या तांदळाच्या इतर जातींमध्ये सामान्यतः आढळत नाही. त्याचा रंग अँथोसायनिन्स नावाच्या रंगद्रव्यांमुळे येतो.
