AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात आलेला साप नाग आहे की नागीण कसं ओळखाल? घरातून कसं पळवून लावावं?

सोशल मीडियावर सापाला पकडण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले जातात. काही वनस्पतींच्या मदतीनेही तुम्ही साप घरातून पळवून लावू शकता, असा दावा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लेमनग्रास, स्नेक प्लांट आणि काही सुगंधी वनस्पतींचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

घरात आलेला साप नाग आहे की नागीण कसं ओळखाल? घरातून कसं पळवून लावावं?
how to identify snakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 10:10 PM
Share

How to find Male Female Snake : घरात साप दिसला की सगळेच घाबरून जातात. साप चावल्याने आपला मृत्यू होईल, अशी भीती अनेकांना असते. परंतु सगळेच साप हे विषारी नसतात. काही सापांपासून माणसाला धोका नसतो. साप दिसला की तो नाग आहे की नागीण असा प्रश्न अनेकांना पडतो. सापाच्या बाह्यरुपावरून तो नाग आहे की नागीण हे समजून येत नाही. त्यामुळे सापाचे लिंग ठरवताना नेमकी काय चूक केली जाते? ते जाणून घेऊ या..

पावसाळ्यात घराच्या अंगणात किंवा बागेत साप दिसल्यास अनेकांना तो नाग आहे की नागीण असा प्रश्न पडतो. मात्र, सापाचे शरीर जाड किंवा बारीक आहे, यावरून त्याचे लिंग ठरवता येत नाही. सापाची लांबी, रंग आणि शरीराची ठेवण यांमध्ये प्रजाती आणि वयानुसार फरक असू शकतो. त्यामुळे केवळ बाह्यरूपावरून साप नर आहे की मादी, याचा अंदाज बांधणे चुकीचे ठरू शकते.

सापाच्या शेपटीवरून लिंग ओळखता येते का?

काही लोक सापाच्या शेवटीवरून तो नाग आहे की नागीण हे ओळखता येते असा दावा करतात. परंतु या दाव्यात तथ्य़ नाही.सापांच्या प्रजातींमध्ये नराची शेपटी मादीच्या तुलनेत लांब आणि निमुळती असू शकते. मात्र, हा फरक सर्व प्रजातींमध्ये सारखाच असेल असे नाही. सापाचे लिंग निश्चित करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ वैज्ञानिक पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे सापाजवळ जाऊन त्याची तपासणी करण्याचा प्रयत्न करणे टाळावे.

घरात साप दिसल्यास काय करावे

घरात साप दिसल्यास घाबरून आपण अगोदर आरडाओरड करतो. त्यामुळे साप जास्तच बिथरतो. परिणामी तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. म्हणूनच साप दिसल्यावर घाबरून न जाता त्याच्यापासून अगोदर सुरक्षित अंतर ठेवा. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तुमच्या घरात लहान मुल किंवा एखादा प्राळीव प्राणी असेल त्यांना अगोदर सापापासून दूर घेऊन जा. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने साप पकडा.

काही वनस्पतींच्या मदतीने साप घरातून पळून जातो का?

सोशल मीडियावर सापाला पकडण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले जातात. काही वनस्पतींच्या मदतीनेही तुम्ही साप घरातून पळवून लावू शकता, असा दावा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लेमनग्रास, स्नेक प्लांट आणि काही सुगंधी वनस्पतींचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परंतु या वनस्पतींमुळे साप घरात येत नाहीत, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक