AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील कोणत्या तुरूंगात दिली जाते फाशीची शिक्षा, कुठे तयार होतो दोरखंड?

Indian Prisons: नाशिकमधील मालेगावातील डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणात आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पण भारताच्या कोणत्या तुरूंगात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होते? जाणून घ्या...

देशातील कोणत्या तुरूंगात दिली जाते फाशीची शिक्षा, कुठे तयार होतो दोरखंड?
कोणत्या तुरूंगात दिली जाते फाशीची शिक्षा, कुठे तयार होतो दोरखंड
| Updated on: Oct 16, 2026 | 12:20 PM
Share

Indian Prisons: नाशिकमधील मालेगावजवळील डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणात आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मालेगाव अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी हा फैसला सुनावला. 16 नोव्हेंबर 2025 रोजी ही घटना घडली होती. एका वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागला. पण देशातील कोणत्या तुरुंगात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येते हे तुम्हाला माहिती आहे का? फाशी देण्यासाठी ज्या दोरखंडाचा वापर करण्यात येतो, तो बाजारातील दोरापेक्षा वेगळा असतो. तो कुठे तयार होतो?

प्रत्येक तुरूंगात नाही फाशी देण्याची व्यवस्था

प्रत्येक तुरूंगात आरोपीला फाशी देण्याची व्यवस्था नाही. त्यासाठी देशातील काही तुरूंगात व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायालय यासंबंधीचे वॉरंट बजावत असते. केंद्राच्या मॉडल प्रीझन मॅन्युअलमध्ये याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील काही प्रमुख तुरूंगात फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिल्लीतील तिहार तुरूंग, पुण्यातील येरवडा तुरूंग ही नावं चर्चेत आहेत. निर्भयाप्रकरणातील चार आरोपींना तिहारमध्ये 2020 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती. तर पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा तुरूंगात फासावर चढवण्यात आले होते.

देशातील काही राज्यात फाशी देण्याची व्यवस्था

महाराष्ट्रातील येरवडा मध्यवर्ती तुरूंगात फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला नोव्हेंबर 2012 मध्ये इथे फाशी देण्यात आली होती. येरवडा तुरूंगात फाशी देण्यासाठी व्यवस्था आहे. इतर काही राज्यातही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटक राज्यातील हिंडलगा जेल, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह इतर काही राज्यातील तुरूंगात फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने आणि ब्लॅक वॉरंट बजावल्यानंतर या तुरूंगात दोषीला फाशीची शिक्षा देण्यात येते.

दोरखंड कुठे तयार होतो?

भारतात फाशीसाठी उपयोगी पडणारा विशेष मनीला दोरखंड हा बिहारमधील बक्सर मध्यवर्ती तुरूंगात तयार होतो. काही वृत्तानुसार, बक्सर तुरुंगात फाशी देण्यासाठीचा दोरखंड तयार करण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून प्रचलित आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दोरखंडाचा वापर हा देशातील प्रमुख तुरूंगात फाशी देण्यासाठी करण्यात येतो. हा दोरखंड बाजारातील मिळणाऱ्या दोरीपेक्षा वेगळा असतो. त्याची मजबुती, टिकाऊपणा आणि विशिष्ट नियमानुसार तो तयार करण्यात येतो. हा दोरखंड J-34 वाणाच्या खास कापसापासून तयार करण्यात येतो. बारीक धागे एकत्र करून हा मोठा दोर तयार करण्यात येतो.

Follow Us
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...