International Receptionist Day 2022 : जाणून घ्या रिसेप्शनिस्ट डे चे महत्व, सेलिब्रेशनबाबत सर्वकाही

| Updated on: May 11, 2022 | 7:00 AM

'इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे'ची सुरुवात अमेरिकेने केली. 1991 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी अमेरिकेत 'इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे' साजरा करण्याचा सुंदर निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अशा लोकांना सलाम देण्यासाठी होता, ज्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते, ते कोणत्याही व्यावसायिक आवारात प्रवेश करताच. हा दिवस ऑफिसच्या रिसेप्शनवर बसलेल्या लोकांचे आभार मानायचा आहे.

International Receptionist Day 2022 : जाणून घ्या रिसेप्शनिस्ट डे चे महत्व, सेलिब्रेशनबाबत सर्वकाही
जाणून घ्या रिसेप्शनिस्ट डे चे महत्व
Image Credit source: TV9
Follow us on

कुठल्याही कार्यालयात आपण प्रवेश केला की, आपलं स्मितहास्याने स्वागत करणारी व्यक्ती दिसते. हीच व्यक्ती आपल्याला कार्यालयात कुठे जायचेय, कुणाला भेटायचे? अशी विचारपूस करते. इतकेच नव्हे तर आपल्याला पाणी किंवा चहा देऊन स्वागत करण्याची व्यवस्था करते. अर्थात ही व्यक्ती म्हणजे रिसेप्शनिस्ट. स्वतःच्या बाबतीत कुठलाही प्रसंग असो रिसेप्शनिस्ट (Receptionists) मात्र स्वतःच्या चेहऱ्यावर कुठलं टेन्शन किंवा दुःख दाखवत नाही. ज्या कार्यालयाची रिसेप्शनिस्ट सुंदर, प्रसन्न असते, त्या कार्यालयातील व्यवस्था सुंदर आणि नीटनेटकी असते, असा अंदाज बांधता येतो. याच रिसेप्शनिस्टच्या कर्तृत्वाचे वर्षातून एकदा अवश्य केले जाते. हा दिवस असतो, मे महिन्यातील दुसरा बुधवार. संपूर्ण जगभर हा दिवस ‘इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे’ (International Receptionist Day) म्हणून साजरा केला जात आहे. यंदा आज म्हणजेच 11 मे रोजी या दिवसाचे सेलिब्रेशन (Celebration) केले जात आहे. चला तर मग या दिवसाचे महत्व तसेच या दिवसाची संकल्पना कशी सुचली? ते विस्ताराने जाणून घेऊया.

अमेरिकेने सर्वप्रथम केले होते सेलिब्रेशन

‘इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे’ची सुरुवात अमेरिकेने केली. 1991 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी अमेरिकेत ‘इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे’ साजरा करण्याचा सुंदर निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अशा लोकांना सलाम देण्यासाठी होता, ज्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते, ते कोणत्याही व्यावसायिक आवारात प्रवेश करताच. हा दिवस ऑफिसच्या रिसेप्शनवर बसलेल्या लोकांचे आभार मानायचा आहे. नॅशनल रिसेप्शनिस्ट असोसिएशनच्या संचालकांनी रिसेप्शनिस्टच्या भूमिकेबद्दल जागरूकता आणि प्रशंसा मिळवण्यासाठी या दिवसाची स्थापना केली होती. हा दिवस सुरुवातीला ‘नॅशनल रिसेप्शनिस्ट डे’ म्हणून साजरा होऊ लागला होता. पण कालांतराने अनेक देशांमध्ये या दिवसाला राजमान्यता मिळाली. पुढे हळूहळू हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा मानला जाऊ लागला. जगभरातील कार्यालयांनी त्यांच्या एंट्री पॉइंटवर पाहुणे मंडळींचे स्वागत करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. म्हणूनच ‘इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे’ जगभर साजरा होऊ लागला.

रिसेप्शनिस्टला संपूर्ण जगभर सुगीचे दिवस

मे महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा होणारा हा दिवस यंदा 11 मे रोजी साजरा होत आहे. असे मानले जाते की रिसेप्शनिस्ट कोणत्याही कार्यालयातील सर्वात मल्टीटास्कर लोकांपैकी एक असतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या सदाबहार हास्यामागे कामाचा मोठा भार असतो. मात्र त्या भाराचे कुठलेही दडपण चेहऱ्यावर कधीच जाणवत नसते. आजकाल या पेशाने संपूर्ण जगभर आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे, या पेशाला सुगीचे दिवस आले आहेत. अमेरिकेत असे मानले जाते की रिसेप्शनिस्ट 48000 डॉलरपर्यंत कमवू शकतात.

हे सुद्धा वाचा

हा खास दिवस कसा साजरा करायचा?

तुमच्या कार्यालयातील रिसेप्शनिस्टसारख्या खास लोकांसाठी हा खास दिवस खास बनवणे खूप सोपे आहे. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये प्रवेश कराल, तेव्हा हसतमुखाने या दिवशी त्यांचे भरभरून अभिनंदन करा. त्यांच्या प्रसन्न, सदाबहार भावनेबद्दल आभाराची भावना व्यक्त करा. त्यांना आजच्या दिवशी एक लहान चॉकलेट दिले तरी चालेल, त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणखी खुलून येईल.