स्वत:च्या कारमध्ये बसून दारू प्यायल्यास पोलीस कारवाई करू शकतात का? प्रत्येक मद्यप्रेमीने जाणून घ्यावेत ‘हे’ कायदेशीर नियम
Drinking Alcohol in Parked Car Rule: स्वतःच्या गाडीत बसून दारू पिणं महागात पडू शकतं का? याबाबत कायदा काय आहे? पोलीस कधी कारवाई करू शकतात? जाणून घ्या...

बऱ्याच लोकांना वाटते की ते त्यांच्या वैयक्तिक गाडीत हवे ते करू शकतात. पण प्रत्यक्षात तसे नसते. जर तुम्हालाही वाटत असेल की गाडी उभी असताना मद्यपान करणे हा कोणत्याही नियमांचा भंग नाही, तर तुम्ही चुकत आहात. त्यामुळे योग्य वेळी नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही अडचणीत येणार नाही.
जर तुम्ही बाजार, उद्यान किंवा रस्त्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी तुमच्या गाडीत बसून मद्यपान केले, तर ते कायद्याचे उल्लंघन मानले जाऊ शकते. याचा अर्थ असा की, जिथे लोकांची सतत वर्दळ असते. अशा गाडीत तुम्ही मद्यपान करू शकत नाही. असे करताना तुम्ही पकडले गेल्यास तुमच्यावर सार्वजनिक मद्यपान कायद्यांतर्गत खटला दाखल केला जाऊ शकतो. जर एखादी व्यक्ती मद्यपान करून गाडी चालवताना आढळल्यास तिच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.
जर चालकाने मद्यपान केले नसेल परंतु गाडी उभी असेल आणि गाडीतील इतर प्रवासी मद्यपान करत असतील, तर तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासंबंधीच्या कायद्यांनुसार खटला चालवला जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यपान केल्यास त्याच्यावर राज्य नियमांनुसार कारवाई केली जाईल. सर्वसाधारणपणे, अनेक राज्यांमध्ये ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती दारू प्यायल्यानंतर भांडण करत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालत असेल, तर त्याच्यावर १०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. एवढेच नाही तर तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. हे लक्षात ठेवा, जर तुम्ही मद्यपान करून गाडी चालवताना पकडले गेलात, तर मोटार वाहन कायद्यांतर्गत तुमच्यावर स्वतंत्र ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणात कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
जर तुमची कार तुमच्या वैयक्तिक गॅरेजमध्ये पार्क केलेली असेल. ती एखाद्या खाजगी फार्महाऊससारख्या ठिकाणी उभी असायला हवी. अशा ठिकाणी मद्यपान करण्याला सार्वजनिक मद्यपानाचे नियम लागू होत नाहीत. याचा अर्थ असा की हे नियम फक्त सार्वजनिक ठिकाणीच लागू आहेत.
