AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप नर आहे की मादी कसे ओळखावे? सापाला दूर ठेवण्यासाठी हे करा..

साप दिसल्यानंतर आपल्यापैकी सर्वांनाच भीती वाटते. नक्की काय करावे आणि काय नाही हे देखील कळत नाही. साप म्हटले तरीही भीती वाटते. मात्र, अनेकदा साप दिसल्यानंतर मोठ्या चुका होतात, ज्यामुळे आपला जीवही जाऊ शकतो.

साप नर आहे की मादी कसे ओळखावे? सापाला दूर ठेवण्यासाठी हे करा..
snakes
| Updated on: Oct 19, 2026 | 12:50 PM
Share

अंगणात मोठ्या प्रमाणात आपण झाडे लावतो. मात्र, यामुळे सापाची भीती अधिक असते. बागेत किंवा आसपासच्या परिसरात साप दिसला की, आपल्यापैकी अनेक लोक घाबरून जातात. पण तो साप नर आहे की मादी आणि त्याला सुरक्षितपणे तिथून कसे हटवता येईल आणि आपणही सुरक्षित कसे राहू असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, साप नर आणि की मादी हेच आपल्यापैकी अनेकांना कळत नाही. सापाची लांबी, जाडी किंवा रंग पाहून त्याचे लिंग ओळखणे सोपे नसते. तज्ज्ञांच्या मते, सापाला स्वतःहून पकडण्याचा किंवा त्याला पळून लावण्याचा प्रयत्न आपल्या अंगलट येऊ शकतो. ज्यामुळे साप चावण्याचा धोका अधिक वाढू शकतो. जर तुम्हाला साप दिसला तर अगोदरच त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. घरातील लहान मुलांना सर्वात अगोदर सुरक्षित स्थळी घेऊन जा. त्यानंतर सापाला बाहेर जाण्यासाठी मार्ग द्या.

त्याला पकडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. साप जर कुठे लपत असेल तर त्यावरही लक्ष द्या. जेणे करून साप नक्की कुठे आहे हे तुम्हाला कळेल. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, जाड साप म्हणजे नर असतो आणि बारीक साप म्हणजे मादी असते, हे ठरवणेच चुकीचे आहे. सापाची शारीरिक ठेवण त्याच्या प्रजातीनुसार आणि त्याच्या वयानुसार असते.

काही प्रजातींमध्ये नराची शेपटी मादीच्या तुलनेत खूप जास्त लांब आणि बारीक असते. परंतू हा फरक सर्व सापांसाठी लागू होत नाही. यासोबतच रंगावरून सापाचे लिंग ओळखणे शक्य नसते. साप नर आहे की, मादी हे पाहण्यासाठी कधीच सापाच्या जवळ जाऊ नये, यामुळे धोका हा अधिक वाढू शकतो. सापाच्या जवळ जाण्याची चूक अजिबात करू नका.

तुम्हाला साप दिसला तर अजिबात त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. घाबरून न जाना दूर सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करा. काही सेकंदात साप आपल्याला चाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत सापाला स्पर्श करणे किंवा काठीने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू नका. हे आपल्या अंगलट येऊ शकते.

Follow Us
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...