AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liquor Prices India : गोव्यात स्वस्त, कर्नाटकमध्ये महाग; दारू एकच, पण वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे भाव; कारण काय?

Liquor Prices India : भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारूची किंमत वेगवेगळी असते. पण किमतींमध्ये एवढा फरक का ? जाणून घेऊया सविस्तर

Liquor Prices India : गोव्यात स्वस्त, कर्नाटकमध्ये महाग; दारू एकच, पण वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे भाव; कारण काय?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 03, 2026 | 8:15 PM
Share

Liquor Prices India : भारतात एका राज्यापेक्षा, दुसऱ्या राज्यात अल्कोहोल किंवा दारूची किंमत खूप वेगळी असू शकते.एकच ब्रँड आणि बाटली असली, तरी ती कुठे विकत घेतली जाते, यावर त्याची किंमत ठरते. भारतामध्ये गोव्यात सर्वात स्वस्त दारू मिळते. पण सर्वात जास्त किंमत ही कर्नाटकमध्ये आहे. काही ब्रँड्ससाठी हे अंतर प्रति बॉटल मागे जास्त असू शकतं. याचबरोबर प्रीमिअम आणि लग्झरी ब्रँड च्या बाबातीत या किमतींमध्ये हजारो रुपयांचं अंतर असू शकतं.

गोव्यात सर्वात स्वस्त दारू

गोव्याची दारू सर्वात कमी किमतींसाठी प्रसिद्ध आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यावर सर्वात कमी टॅक्स, याचा संबंध गोव्याचं टूरिझम ओरिएंटेड मार्केटशी निगडीत आहे. रिपोर्ट्सनुसार, गोव्यात जर एखादी दारूची बाटली 100 रुपयांना मिळत असेल तर दिल्लीत त्यांची किंमत साधारण 134 रुपये होऊ शकते. कर्नाटकमध्ये त्याच बाटलीची किंमत तब्बल 513 रुपयांपर्यंत असू शकते.

म्हणजेच गोव्यातील 100 रुपयांची बाटली कर्नाटकमध्ये 400 रुपये महाग मिळू शकते. या कारणामुळे ब्रँड आणि कॅटेगरीच्या आधारावर किंमतींत फरक गोव्याच्या किमतीपेक्षा अनेक पट जास्त असू शकतो. हरियाणा आणि दिल्लीचाही या ठिकाणांमध्ये समावेश आहे, जिथे दारू अनेक इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त असू शकते.

कर्नाटकमध्ये सर्वात महाग दारू

भारतीय राज्यांमध्ये कर्नाटकमध्ये दारूच्या किंमती सगळ्यात जास्त आहेत. हा फरक मुख्यतः राज्याच्या एक्झाईज ड्यूटी संरचनेशी संबंधित आहे. कर्नाटकमध्ये दारूवर कर सुमारे 83% आहे. मात्र गोव्यात हा कर सुमारे 49% आहे. करात हा मोठा फरक थेट ग्राहकांनी भराव्या लागणाऱ्या किरकोळ किंमतीवर परिणाम करतो.

कर्नाटक सरकारने आपल्या एक्साईज पॉलिसीमध्ये बदल करत अल्कोहोलच्या प्रमाणानुसार नवीन कर स्लॅब प्रणाली लागू केली आहे. या बदललेल्या रचनेचा परिणाम वेगवेगळ्या श्रेणीतील दारूच्या किमतींवर झाला आहे. काही बजेट दारूच्या किमती वाढल्या असून, काही प्रीमियम ब्रँडच्या किमतींमध्येही बदल झाला आहे.

प्रीमियम ब्रँडच्या किमतीत मोठी तफावत

प्रीमियम आणि स्कॉच व्हिस्कीच्या किमतींची तुलना केली तर राज्यनिहाय फरक आणखी स्पष्ट होतो. उदाहरणार्थ, एखाद्या दारूच्या बाटलीची किंमत दिल्लीत सुमारे 3100 असेल तर त्याच उत्पादनासाठी मुंबईत सुमारे 4,000 मोजावे लागू शकतात. म्हणजेच एका बाटलीमागे सुमारे 900 रुपयांचा फरक पडू शकतो.

अल्ट्रा-प्रीमियम ब्रँडच्या बाबतीत ही तफावत आणखी मोठी असू शकते. काही उत्पादनांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये तब्बल 10 ते 12 हजारांपर्यंत वेगळ्या असू शकतात. हा फरक संबंधित राज्यातील कर, एक्साईज ड्युटी आणि स्थानिक प्राइसिंग स्ट्रक्चरवर अवलंबून असतो.

काही राज्यांमध्ये दारू महाग का?

याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की दारूला वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणालीत पूर्णपणे समाविष्ट केलेलं नाही. त्यामुळे दारूवरील कर आणि एक्साईज ड्युटी निश्चित करण्याचा मोठा अधिकार राज्य सरकारांकडे आहे. यामुळे प्रत्येक राज्याची स्वतःची एक्साईज पॉलिसी आणि कररचना असते. राज्यागणिक करांचे दर वेगवेगळे असल्याने एकाच ब्रँडच्या दारूची किरकोळ किंमतही मोठ्या प्रमाणात बदलू शकते.

गोव्यासारख्या राज्यांमध्ये तुलनेने कमी कर ठेवण्यामागे पर्यटन क्षेत्र हे महत्त्वाचं कारण मानलं जातं. दुसरीकडे, काही राज्ये महसूल वाढवण्यासाठी दारूवर तुलनेने जास्त कर आकारतात. त्याचा थेट परिणाम ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या अंतिम किमतीवर होतो.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही दारू महाग

कर्नाटकव्यतिरिक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्येही दारूच्या किमती तुलनेने जास्त असू शकतात. मात्र, एखाद्या राज्यात दारू किती महाग आहे हे ठरवताना ब्रँडची श्रेणी, बाटलीचा आकार, उत्पादनाचा प्रकार आणि संबंधित राज्यातील कररचना हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे दारूच्या बाटलीसाठी संपूर्ण भारतात एकच निश्चित किरकोळ किंमत नसते. त्याऐवजी प्रत्येक राज्यातील एक्साईज पॉलिसी, कररचना आणि स्थानिक किंमत निर्धारणानुसार ग्राहकांना वेगवेगळ्या किमती मोजाव्या लागतात.

Follow Us
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा