AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबा-पणजोबांच्या नावावर जमीन, पण कागदपत्रं सापडत नाहीयेत? काही मिनिटांत असा शोधा रेकॉर्ड

जर तुम्ही तुमच्या आजोबा आणि पणजोबांच्या जुन्या जमिनीची कागदपत्रे गमावली असतील, तर तुमच्या राज्याच्या अधिकृत भूलेख पोर्टलद्वारे घरबसल्या जमिनीची कागदपत्रे तपासण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या..

आजोबा-पणजोबांच्या नावावर जमीन, पण कागदपत्रं सापडत नाहीयेत? काही मिनिटांत असा शोधा रेकॉर्ड
आजोबा-पणजोबांच्या जमिनीची कागदपत्रं सापडत नाहीयेत? अवघ्या काही मिनिटांत असा शोधू शकता रेकॉर्ड Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 11:10 AM
Share

आजच्या काळात अनेक कुटुंबांकडे पूर्वजांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रं व्यवस्थित उपलब्ध नसतात. आजोबा किंवा पणजोबांच्या नावावर जमीन होती, एवढीच माहिती कुटुंबातील सदस्यांना असते. मात्र जुने कागद हरवले, खराब झाले किंवा त्यावरील माहिती अस्पष्ट झाली असेल, तर जमीन नेमकी कुठे आहे आणि तिच्या नोंदी काय आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी सरकारी भूलेख किंवा जमीन अभिलेख पोर्टल उपयोगी ठरू शकतं. अनेक राज्यांमध्ये जमिनीचे रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट शोधा

जमिनीचा शोध घेताना कोणत्याही खासगी किंवा अनोळखी वेबसाइटवर माहिती भरू नका. ज्या राज्यात जमीन आहे, त्या राज्याच्या अधिकृत भूमी अभिलेख किंवा महसूल विभागाच्या वेबसाइटवरच जा. कारण प्रत्येक राज्यातील ऑनलाइन रेकॉर्डची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत पोर्टलवर 7/12 उतारा, 8अ उतारा, फेरफार प्रत, मालमत्ता पत्रक आणि ई-अभिलेख अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत.

जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती अचूक भरा

ऑनलाइन पोर्टलवर गेल्यानंतर सर्वप्रथम जमिनीचं ठिकाण निश्चित करावं लागतं. त्यासाठी संबंधित जिल्हा, तालुका आणि गाव निवडावं. ही माहिती अचूक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चुकीचा जिल्हा किंवा गाव निवडल्यास दुसऱ्या जमिनीचा रेकॉर्ड समोर येऊ शकतो. जमिनीचा सर्व्हे किंवा गट क्रमांक माहीत नसेल तरी काही पोर्टलवर खातेदाराच्या नावाने शोध घेण्याची सुविधा असते. त्यामुळे ज्या आजोबा किंवा पणजोबांच्या नावावर जमीन असल्याची माहिती आहे, त्यांचं नाव टाकून रेकॉर्ड शोधता येतो. काही ठिकाणी खसरा क्रमांक, खाता क्रमांक किंवा खतौनी क्रमांकाच्या आधारेही शोध घेता येतो. मात्र जुन्या कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग किंवा नावाची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे एकदा नाव टाकून रेकॉर्ड न मिळाल्यास उपलब्ध इतर तपशीलांच्या आधारे शोध घेणं उपयोगी ठरू शकतं.

रेकॉर्ड मिळाल्यावर ही माहिती तपासा

समान नावाच्या व्यक्तींच्या अनेक नोंदी असू शकतात. त्यामुळे केवळ नाव जुळलं म्हणून तीच आपली जमीन आहे, असं समजू नये. गट किंवा सर्व्हे क्रमांक, खातेदाराचं नाव, जमिनीचं क्षेत्रफळ आणि गाव यांसारखी माहिती तपासावी. महाराष्ट्रात डिजिटल 7/12, 8अ आणि फेरफार उताऱ्यांसह ई-अभिलेखामध्ये जुन्या स्कॅन केलेल्या नोंदी पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ही बाब विशेष लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑनलाइन दिसणारा भूलेख महत्त्वाची सरकारी नोंद असली, तरी प्रत्येक परिस्थितीत तो मालकी हक्काचा अंतिम दस्तऐवज मानला जात नाही. जमीन विक्री, वारसा, वाटणी किंवा न्यायालयीन वाद असल्यास जुनी रजिस्ट्री, फेरफार नोंदी आणि इतर संबंधित कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते. अशा परिस्थितीत संबंधित महसूल किंवा नोंदणी कार्यालयाकडून प्रमाणित कागदपत्रं घेणं योग्य ठरतं.

जमिनीचा रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध नसेल, विशेषतः अत्यंत जुनी नोंद असेल, तर संबंधित तहसील किंवा महसूल कार्यालयातील अभिलेखांमध्ये शोध घ्यावा लागू शकतो. त्यामुळे मोबाईलवर ऑनलाइन रेकॉर्ड तपासणं हा पहिला सोपा टप्पा आहे; मात्र मालकी हक्क निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी महत्त्वाची आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...