तिसऱ्या टर्मचा PM मोदी यांचा पहिला परदेश दौरा, इटलीत हिंदू की मुस्लीम जादा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. जी-7 शिखर संमेलनात ते सहभागी होण्यासाठी जात आहेत.

तिसऱ्या टर्मचा PM मोदी यांचा पहिला परदेश दौरा, इटलीत हिंदू की मुस्लीम जादा ?
religion in italy Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 6:39 PM

लोकसभा निकालानंतर एनडीएचे सरकार स्थानापन्न होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी निघाले आहेत. इटलीतील G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण मिळाले आहे. 13 ते 15 जून दरम्यान हे शिखर संमेलन इटलीच्या अपुलिया येथे होणार आहे. यास पुगलिया असेही म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे इटली पुन्हा चर्चेत आले आहे. इटली तेथील प्रसिद्ध चर्च आणि रोमन शैलीतील इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील कॅथलिक संस्कृती देखील प्रसिद्ध आहे. इटलीत आणखी कोणत्या धर्माचे लोक रहातात असा प्रश्न त्यामुळे मनात येत असेल तर ही बातमी वाचूयात…

कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक आहेत?

इटलीमधील 74.5 टक्के लोक कॅथलिक आहेत, ज्यात इटालियन रहिवासी आणि परदेशी लोकांचा देखील समावेश आहे. याशिवाय 15.3 टक्के नास्तिक आहेत जे म्हणजेच ते कोणत्याही देवाला मानत नाहीत. याशिवाय 4.1 टक्के नॉन-कॅथलिक ख्रिश्चन आहेत. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की येथील सुमारे 80 टक्के लोक ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे आहेत अशी 2021 मध्ये इंडिपेंडंट सेंटर फॉर स्टडीज ऑफ न्यू रिलिजन्सने जारी केलेली आकडेवारी सांगते.

इटलीतील इतर धर्मियांची लोकसंख्या कमी आहे. त्यातही मुस्लीम लोकांची लोकसंख्या जास्त आहे. इतर धर्मांबद्दल बोलायचे झाले तर येथे केवळ पाच टक्के लोक इतर धर्माचे आहेत. त्यात मुस्लीमांची संख्या सर्वाधिक आहे, मुस्लीमांची संख्या सुमारे 3.7 टक्के आहे. मुस्लीम धर्माव्यतिरिक्त ज्यू, हिंदू, बौद्ध इत्यादी धर्माचे लोकही येथे राहतात.

 महात्माच्या पुतळ्याची तोडफोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला इटली दौरा असताना येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची संशयित खलिस्तानी समर्थकांनी नासधुस केल्याचे उघडकीस आले आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. गांधीजींच्या पुतळ्यावर ग्राफीटी काढून खलिस्तान समर्थकांनी हरिदीप सिंह निज्जर याची नावाने काही मजकूर लिहीला होता. ब्रिंदीसी या शहरातील महात्मा गांधी यांच्या या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या प्रकरणाचा निषेध केला असून आंदोलकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.