AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment Tips: मंत्री लोक कुठे गुंतवतात पैसा? शेअर मार्केट नाही तर… रिपोर्ट पाहून आश्चर्यचकितच व्हाल

Investment Tips: सर्वसामान्यांकडे गुंतवणूकीसाठी काही विशिष्ट पर्यायच असतात. पण मंत्री लोक कुठे गुंतवणूक करतात याची माहिती जाणून घ्या...

Investment Tips: मंत्री लोक कुठे गुंतवतात पैसा? शेअर मार्केट नाही तर... रिपोर्ट पाहून आश्चर्यचकितच व्हाल
| Updated on: Sep 22, 2026 | 10:20 AM
Share

लोक आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतात. काहींना शेअर बाजारात गुंतवणूक करायला आवडते, तर काही जण स्थावर मालमत्तेत (रिअल इस्टेट) गुंतवणूक करतात. पण राजकारणी आणि मंत्री आपला पैसा कुठे गुंतवतात, याबद्दल माहिती जाणून घ्या…

मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आपली मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या जाहीर केलेल्या मालमत्तेच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ सदस्य शेअर बाजारात अजिबात गुंतवणूक करत नाहीत. त्याऐवजी ते FDs, जमीन, दागिने आणि पशुधन यांसारख्या पारंपरिक आणि सुरक्षित पर्यायांना प्राधान्य देतात.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंत्रिमंडळ सदस्यांनी दिलेल्या मालमत्तेच्या माहितीनुसार, ३० पैकी आठ मंत्र्यांनी केवळ एफडीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचा शेअर बाजारात कोणताही सहभाग नाही. दरम्यान, १५ मंत्र्यांनी बाजारात गुंतवणूक केली असून, यापैकी पाच जणांची गुंतवणूक म्युच्युअल फंडात आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह, नागरी हवाई वाहतूक मंत्री के.आर. नायडू, आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम आणि वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी केवळ FDs मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक नाही.

एस. जयशंकर यांनी FDsमध्ये ₹५.५९ कोटी आणि सरकारी मालकीच्या IRFC बॉण्ड्समध्ये ₹५० लाख गुंतवले आहेत, जिथे नुकसानीचा धोका शून्य आहे. त्याचप्रमाणे, जे.पी. नड्डा यांनी आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये इनोव्हा आणि स्थावर मालमत्तेचा समावेश केला आहे. त्यांनी आपले घर बांधण्यासाठी बँकेचे कर्ज आणि वैयक्तिक बचतीचा वापर केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लिस्टेड सिक्योरिटीजमध्ये २.२३ कोटी रुपये आणि नॉन लिस्टेड सिक्योरिटीजमध्ये ३.०७ लाख रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. लिस्टेड सिक्योरिटीजमध्ये म्हणजे एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) सारख्या अधिकृत मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत असलेली वित्तीय साधने. नॉन लिस्टेड सिक्योरिटीज कोणत्याही सार्वजनिक एक्सचेंजवर सूचीबद्ध नसतात.

Follow Us
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...