AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: जगातील असा ही साप… जो बेडकांकडून चोरतो विष… जगाच्या पाठीवर कुठंय ही प्रजाती?

Snake Facts: निसर्गातील अनेक गोष्टी या आपल्या आकलन क्षमते बाहरेच्या आहेत. निसर्गाची अनेक रुप आहेत. त्यात या सापाच्या कृतीने शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतले आहे. हा साप विषारी नाही. पण विषारी बेडकाकडून तो विष मिळवतो आणि त्याच्या शरीरात साठवतो. त्याचा शस्त्रासारखा शिकारीसाठी वापर करतो.

Snake Facts: जगातील असा ही साप... जो बेडकांकडून चोरतो विष... जगाच्या पाठीवर कुठंय ही प्रजाती?
जगातील असा ही साप... जो बेडकांकडून चोरतो विषImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 29, 2026 | 4:12 PM
Share

Red Necked Keelback Snake Facts: निसर्गात अनेक रहस्य दडलेली आहे. ती समोर आल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. विज्ञानासाठी तर हे मोठं आव्हानचं असतं. साप हा त्याच्या विषारी दंशासाठी ओळखला जातो. जगात सापाच्या अनेक प्रजाती समोर आल्या आहेत. अनेक साप विषारी आणि काही बिनविषारी आहेत. सापाच्या प्रत्येक प्रजातीची काही वैशिष्ट्ये आहेत. शास्त्रज्ञांनी अशीच सापाची एक अनोखी प्रजाती शोधून काढली आहे. या सापाच्या शरीरात विष तयार होत नाही. पण तो इतर प्राण्यांच्या शरीरातील विष चोरून, खास करून विषारी बेडकाकडून विष मिळवतो. ते शरीरात साठवतो आणि शिकार करताना अथवा हल्ला करताना त्याचा शिताफीने वापर करतो. सापाचा हा प्रताप पाहून शास्त्रज्ञ सुद्धा हैराण झाले आहेत. या सापाचे नाव रेड-नेक्ड कीलबॅक (Red-Necked Keelback) असे आहे.

Red-Necked Keelback सापाने विज्ञान आश्चर्यचकित

साधारणपणे विषारी सापाच्या शरीरात विष आपोआप तयार होते. पण रेड नेक्ड कीलबॅक असे करत नाही. कारण त्याच्या शरीरात विष तयार होत नाही. तो विषारी बेडूक आणि इतर विषारी प्राणी खातो. या प्राण्यातील विषारी घटक हा साप त्याच्या शरीरात जमा करतो. त्यानंतर हा साप या प्राण्यांमधील बुफाडिएनोलाइड्स (Bufadienolides) नावाचे रसायन त्याच्या शरीरात साठवते. हेच रसायन, विष म्हणून ते वापरतात. त्यामुळे स्वतः विष तयार करता येत नसतानाही या सापाला विषाचा साठा करता येऊन त्याचा शस्त्रासारखा वापर करता येतो.

मानेत दडवतो विष

रेड-नेक्ड कीलबॅक या सापाच्या मानेत काही खास प्रकारच्या ग्रंथी (Glands) असतात. त्यांना नुचल ग्लँड (Nuchal glands) असे म्हटले जाते. याठिकाणी हा साप त्याच्या शरीरात इतर प्राणी खाऊन तयार झालेले विष साठवून ठेवतो. जेव्हा त्याला धोका असल्याचा आभास होतो अथवा शिकार टप्प्यात आली आहे असे वाटते. तेव्हा तो तो या ग्रंथी उंचावतो. तो समोरच्या प्राण्यांना आपल्याकडे विष असल्याचे संकेत देतो.

विशेष म्हणजे हा साप या विषाचा थेट वापर करू शकत नाही. पण आपल्याकडे विष असल्याचा दाखवण्यासाठी तो मोठा फणा उगारतो आणि भयावह फुत्कारतो. त्यामुळे हल्ल्यापासून त्याचा बचाव होतो. विशेष म्हणजे जेव्हा तो विषारी प्राणी खातो, त्यानंतर तो अधिक आक्रमक होतो. तर जेव्हा अनेक दिवस तो उंदीर अथवा इतर प्राणी खातो. तेव्हा मात्र त्याच्या शरीरात विष जमा होत नाही. विषाचा साठा नसला की या सापाचे स्वभाव बदलतो. तो लपण्याचा अधिक प्रयत्न करतो.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला