स्विगीची नवीन ‘MaxSaver’ धमाका ऑफर; 500 रु. पर्यंत सूट मिळवण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स!

आता स्विगी इन्स्टमार्टने एक नवीन फीचर लाँच केले आहे ज्यामध्ये तुम्हाला चेकआउटच्या वेळी ५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ही सवलत केव्हा आणि कशी मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

स्विगीची नवीन ‘MaxSaver’ धमाका ऑफर; 500 रु. पर्यंत सूट मिळवण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स!
swiggy maxxsaver offer save upto 500 on orders know details
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 16, 2025 | 11:53 PM

ऑनलाईन फूड आणि ग्रॉसरी डिलिव्हरी क्षेत्रात स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्विगीने आता एक खास ऑफर आणली आहे. स्विगी इंस्टामार्टवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ‘MaxSaver’ नावाचं नवं फीचर लॉन्च करण्यात आलं आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सना चेकआउटच्या वेळी ₹५०० पर्यंतची सूट मिळण्याची संधी आहे.

MaxSaver’ ऑफरची खासियत काय?

जर ग्राहकाने स्विगी इंस्टामार्टवर एकाच वेळी ₹९९९ किंवा त्याहून अधिकची खरेदी केली, तर त्याला ही सूट आपोआप उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, डिस्काउंट मिळाल्यानंतरही डिलिव्हरी फक्त १० मिनिटांतच होईल, असा दावा स्विगीकडून करण्यात आला आहे.

कोण मिळवू शकेल ही सूट?

‘MaxSaver’ ऑफरचा लाभ स्विगी इंस्टामार्ट सेवा सुरू असलेल्या देशातील १० शहरांमधील ग्राहकांना मिळणार आहे. मात्र, यासाठी ग्राहक BLCK मेंबर असणं गरजेचं आहे. म्हणजेच, जे ग्राहक स्विगीचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतात, त्यांनाच मोठ्या खरेदीवर ही सूट मिळणार आहे.

स्विगीच्या नव्या प्लॅनमागचं गणित

या ऑफरद्वारे स्विगीचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांनी मोठ्या ऑर्डर केल्या पाहिजेत, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं. स्विगीच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही महिन्यांत इंस्टामार्टवरील सरासरी ऑर्डर किंमत ₹४६९ वरून ₹५३४ पर्यंत वाढली आहे. आता MaxSaver फीचरमुळे हा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा कंपनीला आहे.

स्पर्धेत झेप्टोला टक्कर!

स्विगीचं हे MaxSaver फीचर झेप्टोच्या ‘SuperSaver’ ऑफरला थेट टक्कर देत आहे. यामुळे ऑनलाईन ग्रोसरी मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. स्विगी आणि झेप्टो दोन्ही कंपन्या आता ग्राहकांच्या खरेदीशैलीवर लक्ष ठेवून नवनवीन योजना आणण्याच्या तयारीत आहेत.

तर, जर तुमची ऑर्डर मोठी असेल आणि वेळ वाचवत चांगली सूट हवी असेल, तर स्विगी इंस्टामार्टवरील MaxSaver ऑफर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते!