AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagarparishad Election Result 2025: 77 वर्षांच्या आजीबाईंचं तरुणांनाही लाजवणारं कर्तृत्व; नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवताच कोसळलं रडू

ज्या वयात अनेकजण निवृत्त होऊन आरामात आयुष्य जगण्याचा विचार करतात, त्या वयात जळगावातल्या जनाबाई रंधे यांनी नगरपंचायतीची निवडणूक जिंकली आहे. कडक उन्हात पायात चप्पलही न घालता त्यांनी प्रचार केला होता.

| Updated on: Dec 22, 2025 | 2:51 PM
Share
जळगावातील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी पायात साधी चप्पलही न घालता, कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे यांनी नगरसेवकपदी विजय मिळवला आहे.

1 / 5
ना पायात चप्पल ना हातात काठी, तरुणांना लाजवेल असा या आजीबाईंचा वयाच्या 77 व्या वर्षी देखील उत्साह आहे. या वयात जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.

2 / 5
नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जेव्हा त्या नगरपरिषद प्रांगणात आल्या, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांची आणि जवळच्या व्यक्तींची गळाभेट घेताना त्यांचे डोळे पाणावले. हे पाहून उपस्थितही भावूक झाले होते.

3 / 5
जनाबाई रंधे यांचा हा विजय म्हणजे जिद्द आणि विश्वासाचा विजय असल्याचं मानलं जात आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरही जनतेसाठी काहीतरी कार्य करण्याची जनाबाई यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय.

जनाबाई रंधे यांचा हा विजय म्हणजे जिद्द आणि विश्वासाचा विजय असल्याचं मानलं जात आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरही जनतेसाठी काहीतरी कार्य करण्याची जनाबाई यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय.

4 / 5
जनाबाई रंधे यांनी भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. नशिराबादमधल्या प्रभाग क्रमांक 7 अ मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि तिथे त्या विजयी झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रात विजयी झाल्याची घोषणा झाल्यावर आनंदात त्यांना अश्रू अनावर झाले. जनाबाईंनी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची माहिती समोर आली आहे.

5 / 5
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला