
अंतराळात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. कधी-कधी आकाशात अशी एखादी गूढ वस्तू दिसते आणि अचानकपणे गायब होते. तर कधी आकाशातून एखादा तारा तुम्हाला तुटताना दिसतो. सध्या याच अंतराळात काही गूढ गोष्टी घडत आहे. वैज्ञांनिकांनुसार आता लवकरच अंतराळात दोन ब्लॅकहोल एकमेकांना धडकणार आहेत. वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर पृथ्वीवरही मोठं संकट येऊ शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार नासाने एक संशोधन केले आहे. नासाकडे असलेल्या हबल टेलिस्कोपच्या मदतीने तिथल्या वैज्ञानिकांनी काही अंदाज बांधले आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांना MCG-03-34-64 नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी तीन वेगवेगळ्या गोष्टी चमकताना दिसल्या आहेत. विशेष म्हणजे यातील दोन गोष्टी या एकमेकांपासून अवघ्या 300 मिलीयन लाईट इयर दूर होते. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर या चमकदार वस्तू दुसरं तिसरं काही नसून चक्क ब्लॅकहोल आहेत. हे दोन्ही ब्लॅकहोल एकमेकांच्या जवळ येत आहेत.
आकाशात आकाशगंगा आणि ब्लॅकहोल्स यांच्यातील टक्कर पहिल्यांदाच होत आहे असे नाही. सुरुवातीपासूनच ब्लॅकहोल्स आणि आकाशगंगा यांच्यात टक्कर होत आलेली आहे. आपली मिल्कि वे आकाशगंगादेखील आजूबाबजाच्या छोट्या आकाशगंगांना गिळंकृत करते आहे. मात्र अशा घटना घडण्यास कोट्यवधी वर्ष लागतात.
वैज्ञानिकांच्या मते लवकरच दोन ब्लॅकहोल्समध्ये टक्कर होणार आहे.जसे-जसे ते एकमेकांच्या जवळ येतील तसेतसे त्यांच्यात टक्कर होण्याच्या प्रक्रियेला वेग येईल. त्यानंतर मोठा स्फोट होऊन ते एकमेकांत मिसळतील.
दरम्यान, आकाशात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अंतरळात प्रत्येक क्षणाला हजारो गृहांचे तुकडे एकमेकांवर आदळत असतात. यातून मोठी उर्जादेखील बाहेर पडते. दोन ग्रह एकमेकांवर आदळल्यामुळे मोठा उल्कापातही होतो. हा उल्कापात कधी-कधी आपल्याला डोळ्यांना दिसतोदेखील. हजारो वर्षांपूर्वी यातीलच काही उल्का पृथ्वीवरही आदळल्या असाव्यात असे सांगितले जाते. अनेकदा अमूक उल्का पृथ्वीवर आदळणार असल्याचेही वृत्त येते. असे असतानाच आता दोन ब्लॅकहोल एकमेकांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेला आणखी बराच कालावधी आहे. तत्पूर्वी शास्त्रज्ञांना आणखी कोणते शोध लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.