
Why Santa Claus wear same clothes : जगभरात 25 डिसेंबर रोजी नाताळ साजरा केला जातो आणि म्हणूनच सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते. हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन लोक साजरा करत असत. तथापि, आजकाल तो सर्वजण साजरा करतात. ख्रिसमसचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे, अनेक शाळांना , ऑफीसनाही सुट्टी असते. ख्रिसमस म्हणताच सर्वांना सांताक्लॉजची (Santa Claus ) आठवण येते. हसत .हसत येणार , सर्वांसाठी गिफ्टस घेऊन येणारा सांताक्लॉज नेहमी एकाच ड्रेसमध्ये दिसलो. लाल पांढरा ड्रेस आणि पांढरीशुभ्र दाढी.. पण तो नेहमी अशा एकाच पोशाखात दिसतो ? याचा कधी विचार केला आहे का. चला जाणून घेऊया कारण..
खूप प्राचीन इतिहास
सांताक्लॉजचा इतिहास खूप प्राचीन आहे. त्याची कहाणी चौथ्या शतकातील ग्रीक बिशप यांच्यापासून आहे, त्यांचं पूर्ण नाव संत निकोलस असं आहे. ते खूप दयाळू आणि उदार होते. असं म्हणतात की, त्या वेळी, संत निकोलस हे नेहमीच मुलांना गुप्तपणे गिफ्ट वाटत असत आणि तेव्हा ते लाल कपडे घालायचे. ख्रिश्चन धर्मात, लाल रंग हा शहीद आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. त्या वेळी, निकोलस हे मुलांप्रती असलेल्या दयाळूपणासाठी संत मानले जात होते.
त्यानंतर, 19 व्या शतकात, अमेरिकन लेखक क्लेमेंट क्लार्क मूर यांनी “सेंट निकोलसची भेट” नावाची एक कविता लिहिली. त्या कवितेत त्यांनी त्यांना हसऱ्या चेहऱ्याने लठ्ठ, वृद्ध माणसाच्या रूपात चित्र काढलं होतं.
पांढऱ्या रंगाचा अर्थ
पांढऱ्या रंगाबद्दल बोलायचे झाले तर ते शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. सांताक्लॉजच्या दाढीचा पांढरा रंग त्याच्या दयाळूपणाचे प्रतिनिधित्व करतो. शिवाय, पांढरा रंग बर्फाशी संबंधित आहे. बर्फ हा ख्रिसमसच्या हंगामाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच त्यांचे कपडे पांढरे रंगात असतात.
मार्केटिंग कँपेन
20 व्या शतकाच्या मध्यात, एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीने त्यांच्या उत्पादनांवर लाल आणि पांढरे कपडे घातलेला सांताक्लॉजचा फोटो छापला कारण तो त्यांच्या शीतपेयाच्या बाटलीशी अगदी मॅचिंग होता. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक कंपनीनंतर, हळूहळू सर्व कंपन्यांनी या कँपेनचा वापर करून विक्री सुरू केली, ज्यामुळे कंपन्यांना मोठा नफा झाला. म्हणूनच सांताक्लॉजची अशी प्रतिमा घडवण्यात मार्केटिंग कँपेनची महत्त्वाची भूमिका आहे. सांताक्लॉजला सर्वत्र एकाच रंगात पाहिल्यानंतर, लोक त्याच्याबद्दल त्याचदृष्टीने विचार करू लागले, म्हणूनच आता सांता क्लॉज सर्वत्र लाल पांढरा ड्रेस आणि पांढरी शुभ्र दाढी अशााच पेहरावात दिसतो.